अँड्रॉइड युझर्ससाठी…काही टिप्स…

Techno.jpgसध्याच्या काळात सर्वाधिक वेगाने वाढणारी मोबाइल ऑपरेटिंग स्टिस्टीम म्हणून अँड्रॉइड ओळखली जातेय. पण अनेकवेळा मेमरी नसल्यामुळे अॅप्स इन्स्टॉल करताना प्रॉब्लेम येणे , अॅप्स अचानक बंद पडणे यासारख्या समस्या जाणवतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी या काही टिप्स…



> जवळपास सर्व अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये टास्क मॅनेजर असतो. होम की बराच वेळ प्रेस करून ठेवली की तो पर्याय येतो. त्यात सध्या कोणकोणती अॅप्लिकेशन्स सुरू आहेत त्याची माहिती मिळते. त्यातून अनावश्यक अॅप्लिकेशन्स बंद केली तर मेमरी मोठ्या प्रमाणात वाचवता येईल तसेच डिव्हाइसचा वेगही वाढेल. टास्क मॅनेजरसाठी काही अॅप्सही उपलब्ध आहेत. 


> गुगल प्ले व्यतिरिक्त इतर ठिकाणांवरून अॅप्स डाऊनलोड करायची तुम्हाला सवय असेल तर तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर असण्याची शक्यता खूप अधिक आहे. अशावेळी अॅव्हास्ट , एव्हीजी , नॉर्टन, TrustGo यासारखे मोफत उपलब्ध असलेले अॅप्स डिव्हाइसमध्ये असण्याची खूप आवश्यकता आहे. मात्र एकावेळी एकापेक्षा अधिक अँटीव्हायरस इन्स्टॉल करू नका. 


> ५१२ एमबी किंवा १ जीबी रॅम असणाऱ्यांना अनेक वेळा रॅमच्या कमतरतेचा प्रॉब्लेम जाणवतो. यावर तोडगा काढण्यासाठी >> क्लिन मास्टर  << नावाचे फ्री अॅप इन्स्टॉल करा. हे अॅप अनावश्यक अॅप्लिकेशन बंद तर करते पण ब्राऊझर हिस्टरी आणि कॅचे क्लिअर करते. 


> तुमचे एखादे अकाऊंट तुम्ही वापरत नसाल तर ते डिव्हाइसमधून काढून टाका. तसेच ब्लू-टूथ , वायफाय यासारखे कनेक्शन उपयुक्त नसताना बंद करा. 


> अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही डिव्हाइसच्या स्पीडमध्ये परफॉर्मन्समध्ये फरक पडत नाही. अशावेळी डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुमचे डिव्हाइस अगदी सुरुवातीला होते त्या स्थिती जाते. मात्र त्यापूर्वी कॉन्टॅक्ट , एसएमएसचा बॅकअप घेऊन ठेवा. 


> खूप काळापासून तुम्ही डिव्हाइस वापरत असाल तर त्यात अनेक जुनेपुराणे एसएमएस , फोटो असण्याची शक्यता आहे. ते डिलीट करा. खूप मोठी स्पेस मुक्त होईल. 


> तुमच्याकडे इनबिल्ट १६ जीबी मेमरी असली तरी त्यातील काही भाग ऑपरेटिंग सिस्टीम आणि अत्यावश्यक अॅप्ससाठी वापरली जाते. त्यामुळे किमान २ जीबी फ्री ठेवा. इतर अॅप्स , डेटा एक्स्टर्नल मेमरी कार्डला ट्रान्सफर करा. सेटींग्जमध्ये जाऊन हे ट्रान्सफर करता येते किंवा >> App2SD << हे अॅप त्यासाठी वापरता येईल. 


> अॅनिमेटेड वॉलपेपर वापरल्यामुळे डिव्हाइसच्या प्रोसेसरचा खूप उपयोग होतो. त्यामुळे अॅप्स सुरू होण्याचा स्पीड कमी होतो. त्यामुळे असे वॉलपेपर बंद ठेवणे हे स्पीड आणि बॅटरीचे आयुष्य अशा दोन्ही दृष्टीने फायदेशीर आहे.

Exit mobile version