गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज ‘मोटो एक्‍स’ स्‍मार्टफोन

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज 'मोटो एक्‍स' स्‍मार्टफोनस्‍मार्टफोनच्‍या बाजारपेठेत मुसंडी मारण्‍याच्‍या तयारीत असलेल्‍या मोटोरोलाने एक जबरदस्‍त हॅण्‍डसेट सादर केला आहे. गुगल आणि मोटोरोला यांच्‍या संयुक्त उपक्रमातून उत्‍पादन करण्‍यात आलेला ‘मोटो एक्‍स’ हा स्‍मार्टफोन कंपनीने लॉंच केला आहे. या हॅण्‍डसेटची बाजारपेठेत प्रतिक्षा होती. अतिशय दमदार फिचर्स आणि स्‍पेसिफिकेशन्‍समुळे हा हॅण्‍डसेट लवकरच लोकप्रिय होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.



मोटो एक्‍स स्‍मार्टफोनमध्‍ये आधुनिक स्‍पेसिफिकेशन्‍स आहेत. एकतर दोन तगड्या ब्रॅण्‍डचे नाव या हॅण्‍डसेटसोबत जुळले आहे. दुसरे म्‍हणजे हॅण्‍डसेटमध्‍ये असलेले फिचर्स अतिशय स्‍मार्ट आहेत. गुगलने मोटोरोलाला 12.5 बिलियन डॉलर्समध्‍ये टेकओव्‍हर केले होते. हा फोन नव्‍या भागीदारीसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. मोटो एक्‍समध्‍ये 4.7 इंचाचा स्‍क्रीन फुल एचडी डिस्‍प्‍ले आहे. हा डिस्‍प्‍ले 1280*720 मेगापिक्‍सेलचे रिझॉल्‍यूशन देतो. फोन सध्‍या केवळ एकाच रंगात आहे, (काळा)

अतिशय तगडा प्रोसेसर आहे. स्‍नॅपड्रॅगन एस4 क्‍वाड कोर प्रोसेसर असून एड्रीनो 320 जीपीयू (ग्राफिक्‍स प्रोसेसिंग युनिट) देण्‍यात आले आहे. त्‍यामुळे गेमिंगच्‍या चाहत्‍यांना अतिशय रोमांचकारी अनुभव मिळेल. दुसरे महत्त्वाचे फिचर म्‍हणजे, फोनला 2 जीबी रॅम आहे. मोटो एक्‍समध्‍ये ऍण्‍ड्रॉईड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिम आहे. तसेच 10 मेगापिक्‍सेल मुख्‍य आणि 2 मेगापिक्‍सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन सप्‍टेंबरच्‍या अखेरीस विक्रीसाठी बाजारात उपलब्‍ध होईल.हा फोन सध्‍या अमेरिकेत लॉंच करण्‍यात आला आहे. अमेरिकेत या फोनची किंमत 199 डॉलर्स म्‍हणजे जवळपास 11940 रुपये आहे. भारतात हा फोन कधी लॉंच होणार, याबाबत माहिती देण्‍यात आलेली नाही. गुगलने या फोनमध्‍ये 2 डिजिटल सिग्‍नल प्रो‍सेसिंग फिचर दिले आहे. एक ‘ओके गुगल नाओ’चे इंस्‍ट्रक्‍शन्‍स फॉलो करेल. दुसरा आहे मोशन ट्रॅकर, जे हलक्‍या झटक्‍याचेही इंस्‍ट्रक्‍शन्‍स फॉलो करेल. स्‍मार्टफोनमध्‍ये गूगल ग्‍लासप्रमाणेच टचलेस कंट्रोल फिचरही देण्‍यात आले आहे. स्‍क्रीनला स्‍पर्ष न करता कॉल आणि सर्च करण्‍यासारखे कार्य करता येईल. माटो एक्‍सची बॅटरी लाईफ 1 दिवस आहे. (Actual)
मोटो एक्‍समध्‍ये ऍण्‍ड्रॉईड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिम आहे. तसेच 10 मेगापिक्‍सेल मुख्‍य आणि 2 मेगापिक्‍सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन सप्‍टेंबरच्‍या अखेरीस विक्रीसाठी बाजारात उपलब्‍ध होईल.

Exit mobile version