‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट!

mc.jpgमायक्रोसॉफ्टकडून ‘ नोकिया ‘ ची खरेदी 

सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अग्रणी असलेल्या ‘ मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ‘ ने मंगळवारी मोबाइलहँडसेट निर्मितीतील एकेकाळच्या अव्वल ‘ नोकिया ‘ ला सुमारे ४७ हजार कोटी रुपयांना ( ७ . ७ अब्ज डॉलरकिंवा ५ . ४४ अब्ज युरो ) खरेदी करीत असल्याची घोषणा केली . 

या व्यवहारामुळे ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ला ‘ नोकिया ‘ च्या जवळपास सर्वच पेटंटवर दावा सांगता येणार असून ,जगभरातील ३२ हजार कर्मचाऱ्यांची फौज दिमतीला मिळणार आहे . शिवाय ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ला आगामी 
दहावर्षांपर्यंत ‘ नोकिया ‘ हे ब्रँडनेम वापरण्याचा परवानाही मिळाला आहे . नव्या व्यवस्थापनामुळे ‘ नोकिया ‘ चाबाजारहिस्सा वाढल्यास ते कायम ठेवण्याचा अथवा भविष्यात ‘ मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन्स ‘ या नावाने 
हँडसेटबाजारात उतरविण्याचा हक्क मात्र बिल गेट्स यांच्या मालकीच्या कंपनीने राखून ठेवला आहे . 

या व्यवहारामुळे स्मार्टफोन उद्योगात प्रचंड खळबळ माजली नसली तरी बाजारातील आघाडीच्या ‘ अॅपल ‘ 
च्या ‘आयओएस ‘ आणि ‘ गुगल ‘ च्या ‘ अँड्रॉइड ‘ या ‘ ऑपरेटिंग सिस्टीम ‘ ना टक्कर देण्यासाठी ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे . स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी ‘ नोकिया ‘ ने ‘ विंडोज ‘ या 
ऑपरेटिंग सिस्टीमचा आधार घेतला खरा ; पण हे प्रयत्न तोकडे पडले .

Exit mobile version