वायरलेस चार्जिंगचा नोकिया स्मार्टफोन लाँच

luअरे भाई तुला फोन करणारच होतो पण चार्जिंगच नव्हतं… अरे एकच कांडी बाकी आहे… अरे छोट्या पिनवाला चार्जर हाय का… चपटा चार्जर कुणाकडे आहे रे… 

‘चार्जरपीडित’ मोबाइलधारकांच्या तोंडी ही वाक्यं नित्याचीच. पण पुढील काळात ही वाक्ये ऐकायला येण्याची शक्यता कमी आहे. कारण चार्जर बाळगण्याची किंवा जवळ नसल्यास शोधाशोध करण्याची कटकटच आता संपणार आहे. मोबाइल निर्मितीतील आघाडीच्या नोकियाने ‘लुमिया ९२५’ हा वायरलेस चार्जिंगवर चालणारा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. 

‘लुमिया ९२५’ स्मार्टफोनची अन्य वैशिष्ट्ये 

> मेटालिक डिझाइन. 

> १२८० x ७६८ रेझ्युलेशनचा ४.५ इंचीचा VXGA डिस्प्ले स्क्रिन. 

> हातमोजे घातल्यानंतरही वापरता येणारी टच स्क्रीन. 

> नोकियाच्या अधिकृत वेबसाईटवरून ३४,१६९ रूपये एवढा किंमतीत हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता. 

> ८.७ मेगापिक्सलचा कॅमेरा. ऑप्टिकल इमेज, ऑटो फोकस, हायपॉवर ड्युल एलईडी फ्लॅश, १०८० पी एचडी व्हिडिओ रेकॉर्डींग. तसेच १.२ फ्रंट कॅमेरा. 

> २००० एमएच क्षमतेची बॅटरी. 

> १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज क्षमता.

Exit mobile version