स्मार्टफोन विथ बेस्ट कॅमेरा

सुरुवातीला मोबाइल हॅण्डसेटचा उपयोग केवळ संभाषणासाठी किंवा संदेश पाठविण्यासाठी केला जात होता. परंतु दशकभरापूर्वी त्यामध्ये म्युझिक प्लेअर आणि मग कॅमेरादेखील एम्बेड करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भविष्यात या सर्व गोष्टी एकाच मोबाइल डिव्हाइसमध्ये मिळतील, असा अंदाज तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. २00७ मध्ये अँपलने आयफोन व त्यापाठोपाठ विविध कंपन्यांनी स्मार्टफोन लाँच केले व तज्ज्ञांचा हा अंदाज खरा ठरला.
हल्ली स्मार्टफोन निवडताना उत्कृष्ट दर्जाचा आणि जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा असलेले हॅण्डसेट खरेदी केले जातात. जर कॅमेरा क्वालिटी चांगली असेल तर काढलेले फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, पिन्टरेस्ट यासारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरदेखील सहज अपलोड करता येतात. तसेच पिकनिक किंवा पार्टीचे फोटो काढण्यासाठी वेगळा कॅमेरा सोबत ठेवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे केवळ स्टॅण्ड अलोन पॉइंट अँण्ड शूट कॅमेरा घेण्याऐवजी ‘बेस्ट कॅमेरा क्वालिटी’सह इतर फीचर्स असलेला स्मार्टफोन घेण्यास आपण अधिक प्राधान्य देतो. जर तुम्हीदेखील बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यापैकी एखादा ‘स्मार्ट कॅमेरा’ फोन घेण्यास हरकत नाही.


नोकिया ८0८ प्यूअर व्ह्यू ( Now Nokia Lumia 1020 is suggested) 
सर्वाधिक कॅमेरा सेन्सर असलेला फोन म्हणजे नोकियाचा ४१ मेगापिक्सलचा ८0८ प्यूअर व्ह्यू हॅण्डसेट. चार इंचांची AMOLED (active-matrix organic light-emitting diode) टच स्क्रीन या मॉडेलमध्ये देण्यात आली आहे. कॅमेरामध्ये कार्ल झेइसिस ऑप्टिक आणि झेनॉन फ्लॅश लाइट असून फोटो काढण्यासाठी डिफॉल्ट पिक्सल पाच ठेवण्यात आले आहे. तसेच ही र्मयादा ३८ मेगा पिक्सलपर्यंत वाढवली जाऊ शकते. कॅमेरा रेझल्यूशन 7728 – 5368, 7728 – 4354 इतके असून दीड इंचाचा सेन्सर देण्यात आला आहे. तर फोकल लेंथ २६ मि.मी आहे. टच फोकस, इमेज ओरिएन्टेशन, व्हाइट बॅलेन्स, स्टील इमेज एडिटर, फेस रेकग्निशन आदी फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत.


सोनी एक्सपिरिया झेड
वॉटर अँण्ड डस्ट रझिस्टंट व पहिला इमेज सेन्सर असलेला १३ मेगापिक्सल, एलईडी फ्लॅश व ऑटोफोकस स्मार्टफोन म्हणजे सोनी कंपनीचा ‘एक्सपिरिया झेड’. या फोनमध्ये २.२ मेगापिक्सलचा सेकंडरी (फ्रंट) कॅमेरादेखील देण्यात आला आहे. काढलेले फोटो व्यवस्थित दिसावे यासाठी १0८0 पिक्सल स्क्रीन दिली आहे. तसेच फुल एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंगची सोयदेखील या फोनमध्ये आहे. कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन व १६ एक्स झूम असलेल्या या हॅण्डसेटमध्ये फेस डिटेक्शन, जीओ टॅगिंग, इमेज स्टॅबिलायझर, सेल्फ टायमर, स्माइल डिटेक्शन देण्यात आले आहे. 


हुवाई असेंड डी-२
पाच इंचांचा आयपीएस पॅनल डिस्प्ले, 1920-1080 रेझल्यूशन आणि १३ मेगापिक्सलचा कॅमेरा हुवाई असेंड डी-२ मध्ये देण्यात आला आहे. प्रोफेशनल फोटोग्राफीचा अनुभव देण्यासाठी या फोनमध्ये कलर टेम्परेचरचा पर्याय दिला आहे. तर फ्रंट कमेरा 1.3 मेगापिक्सल आहे. तसेच ऑटो फोकस आणि जिओ टॅगिंगची सोय यामध्ये आहे.


लेनोवो के 900
इंटेल अँटॅम झेड-२५८0 प्रोसेसर आणि अँण्ड्रॉइड जेली बिन ४.२ ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या लेनोवो के 900 हॅण्डसेटमध्ये १३ मेगापिक्सलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा, एलईडी फ्लॅश आणि एफ/१.८ ची लेन्स दिली आहे. तर फ्रंट फेसिंग कॅमेरा २ मेगापिक्सलचा असून 88 डिग्री वाइड अँगल दिला आहे. या फोनचा डिस्प्ले ५.५ इंचांचा आहे.


मायक्रोमॅक्स कॅनव्हास ४ ए-२१0
भारतीय बनावटीच्या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनला बाजारात सध्या चांगलीच डिमांड आहे. कॅनव्हास अँण्ड्रॉइड जेली बिन 4.2.1 ऑपरेटिंग सिस्टीम असलेला कॅनव्हास ४ ए२१0 या पाच इंच एचडी आयपीएस कॅपेसिटिव्ह टच स्क्रीनमध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. ऑटो फोकस, एलईडी फ्लॅश आणि १0८0 पिक्सल व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते. तर फ्रंट कॅमेरा पाच मेगा पिक्सलचा देण्यात आला आहे. 


अ‍ॅप्पल आयफोन-५ (Now Apple iPhone 5s is suggested)
अ‍ॅपलने आयफोन-५ लाँच करून जवळपास वर्ष झाले असले तरी या मॉडेलमध्ये असलेला कॅमेरा इतर मॉडेलच्या तुलनेत उत्कृष्ट आहे. ११३६-६४0 पिक्सल रेझल्युशनचा चार इंच रेटिना डिस्प्ले असलेल्या या हॅण्डसेटमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा, एलईडी फ्लॅश असून १/३.२ सेन्सर आहे. तर सेकंडरी कॅमेरा १.२ मेगापिक्सलचा असून फेस डिटेक्शन, एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंग, टच फोकस, जीओ टॅगिंग देण्यात आले आहे.
incoming search terms : nokia lumia 1020 best camera mobile micromax lenovo huawai, apple iphone
megapixels 41MP auto focus geo tagging jelly bean display sony xperia w110 z
 

Exit mobile version