MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

दिवाळीच्‍या खरेदीची ऑनलाइन आतषबाजी, 250 टक्‍क्‍यांनी वाढीचा अंदाज

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 4, 2013
in eCommerce
दिवाळीच्‍या खरेदीची ऑनलाइन आतषबाजी, 250 टक्‍क्‍यांनी वाढीचा अंदाजदिवाळीत बाजारात जाऊन खरेदी करण्याचा एक वेगळाच आनंद असतो; परंतु खरेदीसाठी उडणारी झुंबड आता ब-याच जणांना नकोशी झाली आहे. त्यातच इंधनाचा खर्च वाढल्याने आपल्या मोटारीने जाऊन वेळ आणि इंधन कशाला वाया घालवा, असाही विचार ग्राहक करू लागलेत. पण त्याहीपेक्षा सुरक्षिततेच्या कारणास्तवदेखील काही जणांनी ही खरेदी टाळली आहे. परंतु  ऑनलाइन शॉपिंगवर विविध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने यंदा दिवाळीत याच खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत 250 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज असोचेमने एका सर्वेक्षणात व्यक्त केला आहे  

भरभरून मिळत असलेल्या सवलतींबरोबरच इंधनांच्या वाढलेल्या किमती आणि ऑनलाइन खरेदीसाठी असलेले असंख्य पर्याय यामुळे ऑनलाइन खरेदीचा कल वाढत आहे. त्यातूनही मोठ्या महानगरांमध्ये दुकानात जाऊन खरेदी करण्यामध्ये होणारी गैरसोय तसेच मुख्यकरून सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश लोकांनी ऑनलाइन खरेदीलाच पसंती दिलेली असल्याचे असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले.  
असोचेमने दिल्ली, लखनऊ, कोलकाता, चंदिगड, डेहराडून, पुणे, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, कोचिन, चेन्नई, उदयपूर, जयपूरसारख्या मोठ्या शहरांतील बाराशे व्यापा-यांकडून मिळालेल्या प्रतिसादामध्ये सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीत 250 टक्क्यांनी वाढीचा अंदाज असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.  यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात महत्त्वाच्या शहरांतील दुकानदारांनी ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून पाच हजार कोटींची विक्री केल्याचे रावत यांनी सांगितले.

online-shopping-hit-during-diwali-and-festive-season

या खरेदी/ विक्रीला पसंती मिळणार

भेटवस्तू    58%
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स    41%
कपड्यांच्या अ‍ॅक्सेसरीज    36%
तयार कपडे    36%
गृहोपयोगी वस्तू    16%
संगणक    33%
हॉटेल खोल्या    20%
खेळणी    16%
दागिने    15%
सौंदर्य उत्पादने    12%
आरोग्य उत्पादने    12%

ऑनलाइन खरेदीचे फायदे

०घरपोच सेवेमुळे वेळेची बचत, दिवसाच्या 24 तासात कधीही खरेदी शक्य, गर्दीत न जाता घरच्या घरी सुलभ खरेदी, उत्पादनांची तुलना करणे शक्य  
०दिल्लीतील जवळपास 71 टक्के इंटरनेटसॅव्ही ग्राहकांनी दिवाळीत ऑनलाइन खरेदी, तर 21 टक्के ग्राहकांनी पारंपरिक खरेदीला पसंती दिली आहे.  
०गेल्या वर्षात 55 टक्के मुंबईकरांनी दैनंदिन खरेदी इंटरनेटवरून केली असून यंदा हे प्रमाण 69 टक्क्यांपर्यंत जाईल.

ADVERTISEMENT
Tags: DiwalieCommerceOnlineShopping
ShareTweetSend
Previous Post

हाताने लिहा आणि जीमेल करा

Next Post

वोडाफोनच्या 2G, 3G दरांत तब्बल 80% कपात, रोमिंगमध्येही दर बदलणार नाही

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Next Post
वेगवान अँड्रॉइडसाठी खास टिप्स

वेगवान अँड्रॉइडसाठी खास टिप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech