फोन लाँचर्स कलर थीम ,आयकॉन थीम पॅक

launch.jpgआपल्या फोनमध्ये काहीतरी हटके हवेच… मग तो एखादा दुर्मिळ अॅप असो किंवा मोबाइल थीम! ग्रुपमध्ये आपला फोन उठून दिसावा असं अनेकांना वाटतं , अशा क्रीएटिव्ह मोबाइलप्रेमींसाठी लाँचर्स उपयुक्त ठरेल. आपल्या प्ले स्टोरमध्ये असे विविध लाँचर्स उपलब्ध आहेत. काहींसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील तर काही फ्री आहेत. यापैकी काही निवडक लाँचर्सची माहिती देत आहेत ‘ मटा ‘ च्या टेक्नोटीमचे अक्षय पेंडभाजे… 



नोवा लाँचर (पेड/फ्री)  Nova


हा लाँचर वापरण्यास खूपच सोपा आहे. कलर थीम ,आयकॉन थीम पॅक यासारख्या अनेक थीम चेंज करण्याचे ऑप्शन हा लाँचर देतो. तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर तुमचे आवडते अॅप्लिकेशन्स ठेऊ शकता. एका डॉकवर ७ आइकॉन्स ठेवता येतील. अॅप्लिकेशन ड्रॉवरलाही अनेक इफेक्ट्स देता येतात. तसेच फोल्डरला ही आयकॉन देता येतो. गेश्चर , हाइड अप्लिकेशन असे अनेक फीचर्स या लाँचरमध्ये उपलब्ध आहेत ; पण हा अँड्रॉइडवर ४.० आणि त्याच्या पुढील व्हर्जन्सवर उपलब्ध आहे. 


स्मार्ट लाँचर  Smart Launcher


स्मार्ट लाँचर नाविन्यपूर्ण लाँचर आहे. अगदी सुटसूटीत अन् किमान आयकॉन्स अशी आकर्षक रचना ही याची खासियत. यात कॅटगरीनुसार अॅप्लिकेशनची विभागणी केलेली असते. जास्त कॉन्फिगरेशन न करताच हा लाँचर वापरता येतो. सर्व प्रकारच्या अँड्राँइड डिवाइससवर हे इनस्टॉल करता येऊ शकते. या लाँचरमधील काही महत्त्वाच्या बाबीः क्विक सर्च , * अप्लिकेशन हाइड करता येऊ शकतात. *स्टेटस बार हाइड करण्याची सोय. 


गो लाँचर्स एक्स Go Launcher EX


आपल्या नेहमीच्या अँड्राँइड स्क्रीनला कंटाळले असाल आणि एकदम हटके स्क्रीन हवा असेल तर गो लाँचर्स एक्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. १० , ०००पेक्षा जास्त थीम यात उपलब्ध आहेत. थ्रीडी कोरद्वारे मस्तपैकी फ्लिप्पिंगचा प्रभाव हे या गो लाँचर्सचे वैशिष्ट्य. गेस्चर्स वापरून अॅप्लिकेशन सुरू करण्याचा पर्याय यात उपलब्ध आहेच. यातील मुख्य आकर्षण ठरेल ते लॉक स्क्रीनसाठीचा इफेक्ट. तेव्हा एकदा वापरून बघण्यास काहीच हरकत नाही. 


एस्पायर लाँचर Empire 


आयफोन घेणे प्रत्येकाला परवडेलच असं नाही. मग आयफोनची हौस अँड्रॉइडवर भागवली तर ? आश्चर्य वाटून घेऊ नका , पण एस्पायर लाँचरमुळे हे शक्य आहे. यामुळे तुमच्या अँड्रॉइड फोनचा लूक पूर्णपणे आयफोनसारखा करतो. तर मग हा लाँचर आपल्या अँड्राॅइड फोनमध्ये नक्की वापरुन बघा. 


लाँचर ८ Launcher 8


अँड्रॉइड व आयओएस अशा दोन्ही थीम्सना कंटाळले असाल तर विंडोज यूजर इंटरफेस तुमच्या अंड्रोइड डिवाइसवर ट्राय करण्यास काहीच हरकत नाही. लाँचर एट हा फेक विंडोज ८ यूजर असून अगदी विंडोज फोनसारखेच काम करतो. यातील काही विशेष फीचर्सः *सेव्ह केलेली थीम पुन्हा अणू शकतात , * स्टार्ट स्क्रीनचा लेआऊट बदलू शकता. *स्टेटस बार आणि लॉक स्क्रीन विंडोज फोनप्रमाणे सेट करू शकतात. 


याशिवाय ९१ लाँचर , नेक्स्ट लाँचर , एसएस लाँचर यांसारखे अनेक लाँचर्स सध्या उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाँचर्स निवडत राहा अन् नवीन फोन घेतल्याचा आनंद मिळवा.

More …… Next Launcher , Apex Launcher, ADW Launcher are also popular 

Exit mobile version