ब्लॅकबेरीच्या अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टिम ‘10.2.1 ओएस’ची घोषणा :Android Apps Install support

जानेवारी 2013 मध्ये लाँच करण्यात आलेला ब्लॅकबेरी 10 ओएस मध्ये पहिल्यांदाच महत्वाचे अपडेट करण्यात आले आहेत. ब्लॅकबेरीनं आता BB10.2.1 OS लाँचची घोषणा केली आहे. यात सध्या असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला अनेक नव्या फिचर्सची जोड देण्यात आली आहे.
3rd पार्टी android apps इंस्टॉल करण्याची सोयही या अपडेटमध्ये करण्यात आली आहे 
या अपग्रेडमुळं लॉक स्क्रीन नोटीफिकेशनमध्ये बदल झाला आहे. फोन लॉक असला तरी सेंडर कोण आहे तसेच इमेल, एसएमएस किंवा बीबीएमचा विषय फक्त टॅपिंगमुळं पाहता येणार आहे. ब्लॅकबेरी हब आता बीबीएम, इमेल्स, टेक्स्ट मेसेजेस आणि सोशल नोटीफिकेशनसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कस्टमाईज करता येणार आहे. 
इनकमिंग मेसेज किंवा बीबीएमसाठी स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेली नोटीफिकेशन विंडो आता इमेल्ससाठीही वापरता येणार आहे. युझर नोटीफिकेशन बॉक्सवर टॅपिंग करुन बीबीएम किंवा टेक्स्टला प्रतिसाद देऊ शकेल. ब्लॅकबेरी कॅलेंडरमध्ये आता अपॉइंटमेंटची नोंद किंवा एडिट करणं सोपं झालं आहे.
एखाद्या मिटिंगसाठी पोहचायला उशीर होणार असेल तर युझरला ‘आय विल बी लेट’ ऑपशनची निवड करुन आणि किती वेळ उशीर होणार आहे त्याचा कालावधी नुसत्या बोटाने टॅप करुन सेट करता येईल. कॉपी आणि पेस्ट करणं कोणत्याही टेक्स्ट फिल्डवर डबल टॅपिंगमुळे सोपं झालं आहे. डबल टॅपिंगमुळे टेक्स्ट सिलेक्शन मेनू आणि एडिटिंग ऑप्शन्स सुलभरित्या वापरता येणार आहेत.
वर्ड, एक्सेल किंवा पॉवर पॉईंट फाईल्ससाठी वापरण्यात येणारे डॉक्यूमेंट्स टू गो ला फाईंड अँड रिप्लेस, न्यू फॉर्म्युला फॉर एक्सेल आणि रिहर्सल मोड इन पॉवर पॉईंटस सारखी नवी फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. आता करंट पेज सेव्ह करुन नंतर ऑफलाईनवर ते वाचण्याचा पर्याय असेल.
ओएस अपडेटला ‘रिप्ले नाऊ’ सारखं फिचरची जोड देण्यात आली आहे. ज्यात इनकमिंग कॉलच्या दरम्यान ‘स्पीच आयकॉन’वर क्लिक करुन ‘रिप्ले नाऊ मेसेजेस’ ओपन करता येतील. यात तीन प्री मेड मेसेजेसमधून निवड करता येईल तसेच स्वत:चा कस्टमाईज मेसेज तयार करता येईल.
इतर फ्लॉटफॉर्मवर सध्या जे उपलब्ध आहे ते लक्षात घेता, आता ब्लॅकबेरीनं बॅटरी पर्सेंटेज इंटिकेटर्स आणि मॉनिटरिंग ऑपशन्सचे फिचर देवू केले आहेत. ज्यामुळं यूझरला बॅटरीचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यासाठी मदत होईल. कंपनीनं दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार OS 10.2.1 ही अपडेट आता अमेरिका, युरोप, कॅनडा, मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया पॅसेफिक आणि लॅटिन अमेरिकेसह जगभरात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
यूझर्सना फोनवर नोटीफिकेशन प्राप्त करता येईल किंवा सेटिंगमध्ये सॉफ्टवेअर अपडेट चेक करता येईल. BB Z10, Z30, Q10, Q5 पोर्शे डिझाईन P9982 यावर ही अपडेट उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Extra tags : Blackberry OS update brings ability to install android application on blackberry devices 
Exit mobile version