एचपीने लॉन्च केले 22,990 आणि 16,990 किंमत असणारे दोन टॅबलेट

HPने लॉन्च केले 22,990 आणि 16,990 किंमत असणारे दोन टॅबलेट
HP Slate 6

HP हे दोन्ही टॅबलेट मिडियम बजेट रेंजमधील असून यांची ऑपरेटिंग सिस्टम अ‍ॅन्ड्राइड  4.2.2 जेलीबीन आहे. यासोबतच हे दोन्ही टॅबलेट 3G कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करतात. ड्युअल सिम असणारे हे टॅबलेट रिटेल आणि ऑनलाइन स्टोअरवर दाखल झाले आहेत. 
‘Slate6 VoiceTab’
‘Slate6ची स्क्रिन 6 इंच आहे. ड्युअल फ्रंट स्पिकर्ससोबत या टॅबलेटची म्युझीक क्वॉलिटी चांगली आहे. ‘Slate6मध्ये फ्रंट आणि बॅक कॅमरा आहे. 16GBइंटर्नल मेमरी असणा-या या टॅबलेटची मेमरी, मेमरी कार्डच्या साहाय्याने 32 GB पर्यंत वाढवता येईल. या टॅबलेटची बॅटरी 3000 mAh आहे. Slate6मध्ये 5 मेगापिक्सल कॅमेरासह LED फ्लॅशही लावण्यात आला आहे. 
‘Slate7 VoiceTab’ या दोन्ही टॅबलेटमधील फरक म्हणजे यांची स्क्रिन. Slate7 ची स्क्रिन 7 इंच आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व फिचर्स Slate6 सारखेच आहेत. यामध्येही 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या टॅबलेटची बॅटरी 4100 mAh आहे. 

Deepika Padukone Launching HP Tablets


टॅबलेट सोबतच कंपनीने तिन नोटबुकही लॉन्च केले आहेत. 
* HP Envy17 Leap Motion Special Edition (SE) – किंमत 1.18 लाख रुपये 
*  HP Pavilion 15 TouchSmart Notebook- किंमत 51,825 रुपये
 * HP 15 Notebook- किंमत 29,995 रुपये

गॅजेटच्या शर्यतीत आता HPचे दोन टॅबलेट सहभागी झाले आहेत. कंपनीने 23,700 आणि 17,300 किमतीचे  ‘Slate6’ आणि ‘Slate7’ हे टॅबलेट लॉन्च केले आहेत. या लॉन्चिग सोहळ्यात दीपिका पादुकोण आता कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Exit mobile version