सत्या नादेला मायक्रोसॉफ्टचे CEO

हैदराबाद येथे जन्मलेले सत्या नादेला (वय ४७) यांची जगातील बलाढ्य सॉफ्टवेयर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे नवे सीईओ म्हणून निवड करण्यात आली आहे. स्टीव बाल्मर यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांच्या जागी सत्या यांचे नाव आघाडीवर होते. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आता कंपनीत सल्लागाराची भूमिका बजावणार आहे.


आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद येथे सत्या नादेला यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले. मणिपाल विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स या अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेला जाऊन विस्कॉंसिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळविली. शिकागो येथून सत्या यांनी मास्टर ऑफ बिझनेस अभ्यासक्रम पूर्ण केला.


नादेला गेली २३ वर्ष मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत असून अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून त्यांची कंपनीत खास ओळख आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये २०११ पासून ते सर्वर अँड बिझनेस टूल बिझनेसचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते ऑनलाइन सर्विस डिव्हिजनचे आय अॅण्ड डीचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. शिवाय मायक्रोसॉफ्टच्या बिझनेस डिव्हिजनचे प्रमुखही होते. ३९ वर्षाच्या इतिहासात नादेला हे तिसरे सीईओ आहेत.


Extra Tags : Satya Nadella as  new Microsoft CEO after Bill Gates and Steve Ballmer 

Exit mobile version