क्रेडिट कार्डच्या सुरक्षेसाठी भारतीय-अमेरिकी उद्योजकांनी विकसित केले भन्नाट अॅप

क्रेडिट, डेबिट आणि प्रिपेड कार्ड ऑन आणि ऑफ करण्यासाठी अगदी रिमोट कंट्रोलप्रमाणे काम करणारे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर केव्हा, कुठे आणि कसा त्याचा वापर करावा हे केवळ एका बटणवर ठरविण्याची सुविधा या अॅपमध्ये देण्यात आली आहे.

क्रेडिट कार्डच्या सुरक्षेसाठी भारतीय-अमेरिकी उद्योजकांनी विकसित केले भन्नाट अॅपकार्डकंट्रोल नावाचे हे अॅप सॅन-जोस येथील ऑनडॉट सिस्टिम या कंपनीने विकसित केले आहे. या कंपनीचे मालक अनिवासी भारतीय उद्योजक आहेत. क्रेडिट, डेबिट आणि प्रिपेड कार्ड ऑपरेट करण्यासाठी अगदी रिमोट कंट्रोलप्रमाणे हे अॅप काम करणार आहे. या अॅपसाठी कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या हार्डवेअरची गरज नसून स्पेशल क्रेडिट कार्ड असण्याचीही आवश्यकता नाही. 
यासंदर्भात माहिती देताना ऑनडॉटच्या सीईओ रचना अहलावत म्हणाल्या, की आम्ही कार्ड कंट्रोल अॅप बॅंकांना आणि क्रेडिट कार्ड प्रोसेसर्स यांना विकणार आहोत. त्यानंतर विशिष्ट सेवेअंतर्गत ते ग्राहकांना पुरवले जातील. त्यासाठी कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरप्रमाणे प्रत्येक युजरच्या अॅपसाठी विशिष्ट परवाना शुल्क घेण्यात येईल. 
अधिक माहिती देताना ऑनडॉटचे संस्थापक वडूवूर भार्गवा यांनी सांगितले, की कार्ड कंट्रोल अॅप थेट ग्राहकांना न विकता बॅंकांना आणि प्रोसेसर्स यांना विकण्याचा निर्णय बराच विचार करून घेण्यात आला. त्यांनी त्यांच्या ग्राहकांना माफक दरात हे अॅप उपलब्ध करून द्यावेत, असे आम्ही सांगणार आहोत.
या कंपनीने चार मोठ्या क्रेडिट कार्ड प्रोसेसर्ससोबत करार केला आहे. अमेरिकेतील 10,000 बॅंक आणि क्रेडिट युनियन्सच्या व्यवहारांवर या प्रोसेसर्सचे नियंत्रण आहे.
Exit mobile version