विंडोज १०, होलोलेन्स, कोर्टाना व एज ब्राऊजर बद्दल …

मायक्रोसॉफ्टच्या Build २०१५ मध्ये झालेल्या महत्वाच्या घडामोडींबद्दल थोडक्यात माहिती.
मायक्रोसॉफ्ट Build २०१५ २८ एप्रिल रोजी पार पडला जिथे मायक्रोसॉफ्टने अनेक गोष्टींबद्दल जबरदस्त प्रेझेंटेशन्स दिली. येणार्‍या विंडोज १० बद्दल अधिक फीचर्स, HoloLens ह्या क्रांतिकारी प्रॉडक्टचे आणखी डेमो तसेच इंटरनेट एक्सप्लोरर बंद करून नव्याने सादर केलेला एज (Edge) ब्राऊजर ……

गेल्या काही वर्षात मायक्रोसॉफ्ट चुकीच्या निर्णयामुळे बरच माग पडलय मात्र आता नव्याने ओएस सादर करत त्यात अनेक दमदार फीचर्सची जोड देत पुन्हा पूर्वीसारखं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. मोबाइलचं मार्केट अँड्रॉइडने आधीच खाऊन टाकलं आहे तेच आता पीसीबद्दल होऊ नये याची काळजी मायक्रोसॉफ्टला नक्कीच घ्यावी लागेल.

विंडोज ७ / विंडोज ८ / विंडोज ८.१ वापरणार्‍या “प्रत्येक यूजर”ला विंडोज १० ही ओएस एक वर्ष “मोफत” देण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतलाय! अगदी तुम्ही विंडोजची pirated कॉपी वापरत असाल तरीही ! (मात्र pirated कॉपी ही विंडोज १० मध्ये सुद्धा pirated चं राहील.)   

डेवलपर सपोर्ट : सध्या सर्व डेवलपरचा ओढा अँड्रॉइडकडे दिसत आहे मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी मायक्रोसॉफ्टने अँड्रॉइड व iOS apps विंडोजवर वापरता येण्याची सोय केली आहे (त्याच Appsचा कोड सोप्या पद्धतीने compile करून विंडोज स्टोअरवर टाकता येईल) तसेच विंडोजसाठीचे कोडिंग टूल्स आता OS X व लिनक्स वर देखील उपलब्ध करण्यात आले आहेत.

डिवाइस सपोर्ट : मायक्रोसॉफ्टने सर्व प्रकारच्या डिवाइसवर विंडोज वापरता येण्यासाठी काही बदल केले आहेत.
जेणेकरून तुम्ही टॅब्लेट वापरत असाल तर टचच्या दृष्टीने चांगला UI व लॅपटॉप वापरत असाल तर विंडोज ७ सारखा UI दिला जाणार आहे. (मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ मधली जवळपास सर्व चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे !)मायक्रोसॉफ्टचं येत्या काही वर्षात विंडोज १० तब्बल १ बिलियन डिवाइसवर आणण्याच लक्ष्य आहे !

कोर्टाना : पीसीसाठीचा पहिलाच वॉइस असिस्टंट ज्यात कोर्टाना नावाची Halo गेममधील पात्र आपल्याला कम्प्युटर वापरण्यात व आपले काम अधिक जलद करण्यात मदत करते जसे की हवामान विचारल्यास लगेच सांगणे किंवा प्रश्न विचारल्यास इंटरनेटव्हीआर उत्तर शोधून लगेच सांगणे इ. तसेच आपण cortana कडून अलार्म, रीमेंडर, ठिकाणे, फोटोज, मूवीज, म्यूजिक, कॉल, इंटरनेट सर्च, मॅप सहाय्य, इत्यादि अनेक कामे करून घेऊ शकतो.
कोर्टानाबद्दल अधिक माहिती साठी हा लेख वाचा

Edge ब्राऊजर : इंटरनेट एक्सप्लोररचा स्लो स्पीड तर आपणा सर्वांना परिचयाचा आहेच. त्यात काळासोबत जुळवून न घेता आल्यामुळे मायक्रोसॉफ्टने सरळ इंटरनेट एक्सप्लोररला बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता विंडोज १० मध्ये Edge नावाचा ब्राऊजर असेल. ज्यात अनेक आधुनिक फीचर्स असतील व वापरण्यास अधिक वेगवान, सोपा असेल. एक्सबॉक्स स्ट्रीमिंगसाठी तर हा बेस्ट ब्राऊजर ठरणार आहे. स्क्रीनवरचा कोणताही भाग निवडून तो लगेच शेअर करण्याचं मस्त फीचर देखील यात आहे. (याच ब्राऊजरला आधी Spartan ब्राऊजर म्हणण्यात आल होत)

क्रांतिकारी होलोलेन्स : मायक्रोसॉफ्टचं हे प्रॉडक्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. अॅक्चुअल होलोग्राम्स नसले तरी VR हेडसेटद्वारा आपल्या आसपासच्या जगाशी संबंध ठेऊन देणारं हे आधुनिक यंत्र आहे. याची भविष्यातील नव्या प्रकारच डिवाइस म्हणून गणना होईल. Build 2015 मध्ये याच्यावरील आणखी Apps चा डेमो दाखवण्यात आलाय. अक्षरशः थक्क व्ह्यायला होईल इतक भन्नाट प्रॉडक्ट बनवलं आहे. minecraft ही प्रसिद्ध sandbox गेम देखील खास ह्यासाठीच विकत घेतल्याच म्हणणं आहे. ही गेम अश्या प्रॉडक्ट साथी परफेक्ट ठरेल असा त्यांना विश्वास आहे.
हयावरील नवीन विडियो देखील त्यांनी सादर केला आहे. यूट्यूब वर पाहू शकता. (नक्की पहा!)

अपडेट : विंडोज १० हे विंडोज ओएसचं शेवटचं व्हर्जन असणार आहे !

डायरेक्ट यूट्यूब लिंक : https://www.youtube.com/embed/YrB5bSjAcxI

Incoming Search Terms :
Hololens Windows 10 android linux iOS edge browser download cortana dveleopers

Exit mobile version