MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

मायक्रोसॉफ्टचा धमाका : विंडोज १०, सर्फेस हब, होलोलेन्स, स्पार्टन ब्राऊजर, कोर्टाना

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 25, 2015
in Wearables, ऑपरेटिंग सिस्टिम्स, सॉफ्टवेअर्स, ॲप्स
ADVERTISEMENT
गेल्या काही वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या इवेंटमध्ये काय होणार याची जवळपास सर्वच माध्यमांना आधीच खबर असायची. मात्र यावेळच्या इवेंटमधील काही गोष्टी अतिशय गुप्त ठेवण्यात मायक्रोसॉफ्ट यशस्वी झालं.  दिनांक २१ जानेवारी रोजी झालेल्या इवेंटमध्ये मायक्रोसॉफ्टने अनेक भन्नाट प्रोडक्टस सादर केली.

मायक्रोसॉफ्टने सादर केलेली प्रोडक्टस :

  • विंडोज १० 
  • कोर्टाना इंटिग्रेशन 
  • स्पार्टन ब्राऊजर 
  • Win 7/Win 8/Win 8.1 यूजर्सना Win 10 साठी 1वर्ष फ्री अपग्रेड 
  • सर्फेस हब (84 इंच 4K डिस्प्ले) 
  • विंडोज होलोग्राफिक
विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम Win ७, Win ८ & Win ८.१ वापरणार्‍या यूजर्सना एक वर्ष मोफत दिली जाणार आहे ! मायक्रोसॉफ्टचं हे एक मोठ पाऊल म्हणावं लागेल. ह्या निर्णयाला विंडोज ८ वरील यूजर्सची नाराजीच कारणीभूत ठरली. मात्र या मोफत स्कीमसाठी तुमच्याकडील ओएसदेखील ओरिजिनल असावी लागेल (भारतात जास्त लोक पायरेटेड ओएस वापरतात)

पीसी : स्टार्ट मेनू विंडोज 8 प्रमाणे नसणार तर त्याऐवजी स्टार्ट मेनू रिडिजाइन करण्यात आला आहे.  उजव्या बाजूला अॅक्शन सेंटर देण्यात आला आहे. तसेच अनेक बदल करण्यात आले आहेत जे पीसीवर काम करण अधिक सोपं बनवतील. विंडोज Apps आता लहान साइज मध्ये देखील पाहता येतील. 

कोर्टाना : मायक्रोसॉफ्टचा वॉइस असिस्टेंट कोर्टाना जो अॅक्चुअली विंडोज फोनवर उपलब्ध आहे तो आता विंडोज 10 पीसीवर देखील उपलब्ध करण्यात आला आहे. कोर्टाना ही अॅक्चुअली Halo या गेम मधली कॅरक्टर आहे तीच नाव या असिस्टेंटला देण्यात आलय. आपल्या कोणत्याही प्रश्नाच उत्तर कोर्टाना सहज देईल.

यूनिवर्सल अॅप्स :  आजपर्यंत फोन,टॅब्लेट, लॅपटॉप, पीसी अश्या प्रत्येक डिवाइससाठी वेगळी सॉफ्टवेअर बनवावी लागायची मात्र विंडोज 10 या सर्व डिवाइसना सपोर्ट करेल. मायक्रोसॉफ्टने इवेंटवेळी काही ऑफिस अॅप्ससुद्धा सादर करून दाखवली. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत एकप्रकारची क्रांतीच म्हणावी लागेल. 


एक्सबॉक्स  :  मायक्रोसॉफ्टने एक्सबॉक्स आता पीसीवरच उपलब्ध करून दिलं आहे. जर तुमच्याकडे एक्सबॉक्स असेल तर तुमच्या विंडोज 10 पीसी वर देखील एक्सबॉक्स गेम्स वापरू शकता, मित्रांना मेसेजेस, स्क्रीनरेकॉर्ड पाठवू शकता. डायरेक्टएक्स 12 चा सपोर्ट हे देखील याच एक वैशिष्ठ्य. एक्सबॉक्सवर मायक्रोसॉफ्टच खास लक्ष दिसून येत आहे.

सर्फेस हब : मायक्रोसॉफ्टने आणखी एक नवं टच डिवाइस सादर केल आहे हे मुख्यतः टीम मध्ये ग्रुप मीटिंग करताना उपयोगी पडेल. 84 इंच डिसप्ले असलेल हे मॉनिटर सारखं डिवाइस विंडोज 10 वर चालेल. एका वेळी दोन मेंबर्ससोबत स्काइपवरुन कॉल करून त्यांनाही ह्यात सहभागी करता येईल.  ह्या डिवाइसमध्ये 4K डिसप्ले, 1080 रेजोल्यूशनचे 2 विडियो कॅमेरा, आणि मायक्रोफोन व कायनेक्ट टेक आहे.

 

स्पार्टन ब्राऊजर : या ब्राऊजरबद्दल माहिती आधीच लीक झाली होती. हा फोन प्रथमतः विंडोज फोनवर सादर करण्यात येईल. ह्यामध्ये Pocket App सारखे नोट घेण्याचे फीचर आहे, तसेच वेबसाइटवरील ठराविक पार्ट शेअर करता येईल व नंतर वाचण्यासाठी Reader मध्ये साठवता येईल.

वरील प्रोडक्टस स्पष्ट करणार्‍या विडिओजची प्लेलिस्ट पोस्टच्या शेवटी दिलेली आहे, ती नक्की पहा…. 

विंडोज होलोग्राफिक : मायक्रोसॉफ्टने क्रांतिकारी टेक्नॉलजी सादर केली आहे जिला त्यांनी होलोलेन्स असं नाव दिलय. मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स कंपनीने बनवलेल सर्वात इनोवेटीव प्रॉडक्ट आहे. आजपर्यंत सायन्स फिक्शन असणार्‍या होलोग्राम्सना सायन्स फॅक्ट बनवण्याचा प्रयत्न झालाय. अत्यंत भन्नाट असं हे प्रॉडक्ट आपल्याला आपल्या रूम मध्ये फिरत फिरत असताना आपण गेममध्ये स्वतः फिरत असल्याचा अनुभव देईल. हवेत बोटे फिरवून 3डी आकार बनवता येतील.

अधिक सोप्या पद्धतीने ही टेक्नॉलजी समजण्यासाठी खालील विडियो पाहाच….

  
वरील सर्व प्रोडक्टसचे यूट्यूब विडियोज :: 

  • सर्फेस हब 
  • विंडोज १०
  • मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स
  • विंडोज १० इवेंट हायलाइट
Tags: AppsBrowserHoloLensMicrosoftOperating SystemsSoftwaresSpartanSurfaceWindowsWindows 10Xbox
ShareTweetSend
Previous Post

CES 2015 टेक मेळ्याचा एक आढावा – (दिवस पहिला)

Next Post

फेसबूकने सुरू केलय फ्री इंटरनेट रिलायन्ससोबत

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
Next Post
फेसबूकने सुरू केलय फ्री इंटरनेट रिलायन्ससोबत

फेसबूकने सुरू केलय फ्री इंटरनेट रिलायन्ससोबत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech