मोबाइल इंटरनेट प्लॅन चालू/बंद करण्यासाठी एकच नंबर !

मोबाईलची इंटरनेट सेवा बंद किंवा सुरू करण्यासाठी सप्टेंबरपासून हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. 1925 या टोल फ्री क्रमांकावर मोबाईलधारकाला फोन करून किंवा एसएमएस पाठवून या सेवेचा फायदा घेता येईल.

इंटरनेट शुल्काबाबत ग्राहकांकडून दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ट्रायने ग्राहकांच्या सोयीसाठी हा पर्याय दिला आहे. START किंवा  STOP अशा शब्दांचा वापर करून ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर एसएमएस पाठवता येईल किंवा फोन करूनही ही सेवा सुरू किंवा बंद करता येईल.

काही कंपन्या ग्राहकांना न सांगताच परस्पर इंटरनेट प्लॅन सुरू करून पैसे उकळण्याचे काम करत असून या बीडीडीएल अनेक तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.  तसेच ग्राहकाचा प्लॅनमध्ये दिलेला डाटा संपल्यानंतर इंटरनेट बंद होण्याऐवजी मुख्य बॅलेन्समधून पैसे कापून घेण्याचा प्रकार देखील बरेच वर्षे सुरू आहे. अशा समस्यांवर उपाय म्हणून TRAI ने ही नवी हेल्पलाइन सुरू केली आहे.  ज्यामुळे कंपन्या यूजरच्या परवानगी शिवाय पुढील इंटरनेटसाठी पैसे घेऊ शकणार नाहीत.  
इंटरनेट पॅक संपल्यास नेट बंद करण्यासाठी : 
“STOP” असा मेसेज  “1925” या क्रमांकावर पाठवा.  
Exit mobile version