YU युटोपिया सादर : जगातील सर्वात ताकदवान फोन असल्याचा दावा !

ADVERTISEMENT
Yu Yutopia

मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीबद्दल आपणा सर्वांना माहिती आहेच. अँड्रॉइड ओएस असलेले स्वस्त फोन विकणारी कंपनी अशी ओळख बनली आहे. सोबत दर महिन्याला कित्येक मॉडेल्स आणि त्यांच्या विचित्र किंमती हीसुद्धा यांचीच ओळख! याच कंपनीने वर्षापूर्वी त्यांच्या छायेखाली YU (यू) नावचा ब्रॅंड सादर केला होता. ह्या ब्रॅंडचे मोबाइल गुणवत्ता चांगली, चांगला सॉफ्टवेअर सपोर्ट, परवडतील अशा किंमती असे तीन मोबाइल सादर केले गेले ( Yureka, Yunique, Yuphoria, YurekaPlus)

आणि आता याच कंपनीने नवा फोन आज सादर केलाय. त्याचं नाव युटोपिया(Yutopia) असं आहे. प्रत्येक हार्डवेअरसाठी जगातल्या सर्वोत्तम कंपनीपैकी निवड करून त्यांचं हार्डवेअर यामध्ये वापरलं आहे. अॅपल, सॅमसंग, एलजी, वनप्लस अशा कंपनीना लक्ष्य करून गेले काही दिवस जाहिराती केल्या जात होत्या. Yu ब्रॅंडतर्फे असा दावा करण्यात आला आहे की आज पर्यंतचा जगातला सर्वात ताकदवान फोन युटोपिया हा आहे!

यू युटोपिया फीचर्स :

  • कॅमेरा : सोनी : 21 एमपी (4K विडियो रेकॉर्डिंग), 8MP फ्रंट 
  • डिस्प्ले : शार्प : 5.2″ WQHD डिस्प्ले (2K स्क्रीन) कोर्निंग कॉनकोर ग्लास  
  • ओएस : CynogenOS12.1 ( अँड्रॉइड लॉलीपॉप 5.1)                
  • साऊंड : डीटीएस : स्पीकर सोबत 3 माइक 
  • प्रॉसेसर : क्वालकॉम : Snapdragon 810 64 बीट ऑक्टाकोर  
  • रॅम : 4जीबी आणि स्टोरेज : 32जीबी   
  • सेन्सर : फिंगरप्रिंट, G, Proximity, Accelerometer , Gyroscope, Barometer, Light
  • बॅटरी : 3000mAh सोबत फास्ट चार्ज (0%-60% चार्ज 30 मिनिटात)     
  • 4जी LTE सपोर्ट, 6 लेन्स OIS कॅमेरा, बोटाने टॅप करून सेल्फी काढण्याची सोय
  • Around Yu नावाचं App देईल अनेक सुविधा जसे की टॅक्सी, रेल्वे, बस, खाद्यपदार्थ यांच्याससाठी वेगळे Apps घेण्यापेक्षा हे एकाच App सर्वांची बूकिंग करण्यासाठी वापरता येईल.     
  • किंमत : रु. 24,999 !  
मायक्रोमॅक्स आणि Yu चे संस्थापक राहुल शर्मा यांनी आजच्या पूर्ण कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. या फोनच्या “भारतीय”त्वावर त्यांनी जास्त भर दिला की सर्वात ताकदवान फोन भारतात बनवला गेलाय. या सादरीकरणात फोनमध्ये वापरल्या गेलेल्या हार्डवेअरच्या कंपनीतर्फे सुद्धा प्रतिनिधी उपस्थित होते. 



Yutopia ट्रेलर : लिंक : youtu.be/W1kfVtYS-W0

  
Exit mobile version