अॅपल LoopYouIn कार्यक्रम : अॅपल आयफोन SE, आयपॅड प्रो…

आयफोन SE 

अलीकडे अॅपलने त्यांच्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या स्क्रीनचा आकार बराच मोठा करत नेल्यामुळे अनेक ग्राहकांमध्ये नाराजी होती. आयफोन 5S नंतर 4 इंच स्क्रीन असलेल्या नव्या फोनची अपेक्षा होती. मात्र त्यानंतर आलेल्या आयफोन 6 आणि 6S यांच्या स्क्रीन 5 इंची होत्या. आयपॅड बाबतीतही तसेच झाले. नव्या आयपॅड मधील 12.9″ स्क्रीनमुळे कंपनीला बर्‍याच रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र काल झालेल्या कार्यक्रमात नवा फोन, टॅब्लेट सादर करून त्यांनी ही नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

आयफोन SE आणि आयफोन 5 

आयफोन SE : हा फोन खरेतर 5S मॉडेलचं पुढील व्हर्जन आहे. सध्याच्या 6S मधील सुविधा SE मध्ये 4 इंची स्क्रीनवर मिळणार आहेत. नवा प्रॉसेसर, नवा कॅमेरा, नवा रोज गोल्ड कलर.

फीचर्स :

  • डिस्प्ले : 4 इंच 326 DPI 
  • रेजोल्यूशन : 1136×640 
  • प्रॉसेसर : A9 64बीट  रॅम : 2GB 
  • कॅमेरा : 12MP+ 1.2MP(Back) 4K विडियोची सुविधा!
  • बॅटरी : 1642mAh (~14 तासांचा टॉकटाइम)  
  • ओएस : iOS 9.3
  • इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, 4G, 16GB/64GB मध्ये उपलब्ध            
आयपॅड प्रो 12.9 इंच  आणि 9.7 इंच  

आयपॅड प्रो : गेल्या वर्षी सादर झालेला 12.9 इंची आयपॅड प्रो आता 9.7 इंची स्क्रीनमध्ये सुद्धा मिळेल. बाकी तसा काही खास फरक नसलेल्या या टॅब्लेटला चांगला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा अॅपलला आहे.

अॅपल वॉचचे नवे पट्टे !  

अॅपल वॉच : अॅपल वॉचची किंमत आता बरीच कमी करण्यात आली असून सोबतच अॅपलने नव्या बॅंडसना बाजारात आणलं आहे जेणेकरून वापरकर्त्यांना अधिकाधिक फायदा घेता येईल. किंमत आता $299(रु. 20000)
मात्र हे घड्याळ केवळ आयफोन सोबतच काम करतं !

याच कार्यक्रमात अॅपलने त्यांच्या कंपनीचं कामकाज कसं पर्यावरणपूरक आहे त्याबद्दल डेमो दिला.
अॅपल जुने वापरलेले फोन करण्यासाठी लियम नावाच्या रोबोचा कसा वापर करते ते पहा खालील विडियोमधे..

                      

Exit mobile version