अँड्रॉइड N ऑपरेटिंग सिस्टम प्रीव्यू सादर !

गूगलची प्रसिद्ध मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड अत्यंत लोकप्रिय आहे हे तर आपणा सर्वांना माहीत आहेच. सामान्यपणे या ओएसचं नवं व्हर्जन (आवृत्ती) आधी काही डेवलपर्सना वापरायला उपलब्ध केलं जातं जेणेकरून त्यांनी त्यामधील त्रुटी समोर आणून त्यावरती काम सुरू करावं. सध्याचं ताजं व्हर्जन म्हणजे अँड्रॉइड ६.० मार्शमेलो. गूगल अँड्रॉइड ओएसच्या व्हर्जनची नावं ठरवताना ABCD नुसार डेजर्ट/पदार्थावरून नावं ठरवत. (जसे की C कपकेक, D डोनट, E एक्लेयर, F फ्रोयो, G जिंजरब्रेड, H हनीकोंब, I आइसक्रीमसॅंडविच, J जेली बीन, K किटकॅट, L लॉलीपॉप, M मार्शमेलो,…) अद्याप मार्शमेलो म्हणावं तितक्या फोन्सवर वापरलं जात नसताना गूगलने अँड्रॉइडच नवं व्हर्जन आणून आश्चर्याचा धक्काच दिला आहे. यामध्ये अनेक नवी फीचर्स दिली असून ही ओएस वापरणार्‍या लोकांना आपोआप अपडेट दिली जातील. (सध्या केवळ नेक्ससवर उपलब्ध)

आता पाहूया अँड्रॉइड N मध्ये नवं काय आहे …

  • Multi Window Mode : बर्‍याच प्रतिक्षेनंतर अँड्रॉइडने शेवटी हा पर्याय आणलाच. आपण जसे पीसीवर अनेक विंडो वापरतो तशा प्रकारे मोबाइलवर सुद्धा एकाहून अधिक Apps एकाच वेळी वापरता येतील ! हा पर्याय सॅमसंगच्या काही फोन्सवर उपलब्ध होता. या मोडमुळे एकाच वेळी गॅलरी व इमेल अॅप्लिकेशन एकदम वापरता येतील. यासाठी Split Screen चा पर्याय आहे ज्याद्वारे आपण Multi Window वापरू शकू.
  • नवा सेटिंग मेन्यू : या व्हर्जन मध्ये सेटिंगमध्ये सुद्धा अनेक बदल करण्यात आले आहेत. आता सेटिंगमधील पर्यायात  आता समोरच आपण कोणत्या वायफायल जोडलेले आहोत ते दिसेल! सोबतच समझा आपण वायफाय मेनू मध्ये असू तर आपण डावीकडे स्वाइपकरून लगेच बाकीचे सेटिंग पर्याय पाहू शकतो (फोटो क्रमांक 2.2 मध्ये पहा )
android-n-settings (4)
2.2 स्वाइप सेटिंग मेन्यू 
  • नवा नोटिफिकेशन पॅनल : होमस्क्रीनवरून खालच्या दिशेने स्वाइप केले असता येणारा पॅनल म्हणजेच नोटिफिकेशन पॅनल. या नव्या अँड्रॉइड मध्ये बरेच नवे पर्याय दिले असून आता अधिक बटन्सचा वापर करता येईल.
  • डिस्प्ले साइज बदला : हा पर्याय काही फोन्समध्ये उपलब्ध होता मात्र आता  अँड्रॉइडने स्वतः ही सोय करू दिली असून यालाच DPI बदलणे सुद्धा म्हणतात. 
  • वेगवान App Optimization : काहीवेळा आपण फोन रिस्टार्ट केला किंवा अपडेट केल तर सुरूवातीला काही वेळ Optimizing Apps असा मेसेज दिसतो. ह्या अँड्रॉइडमध्ये त्यासाठीचा वेळ बराच कमी केला गेलाय. 
  • Recent Apps पहा : ह्या पर्यायात सुद्धा अनेक बदल करण्यात आले असून यामध्ये आता Apps ची चित्रं मोठी दिसतील. तसेच काही Taps द्वारे तुम्ही सध्याचे App आणि यापूर्वी वापरलेले App लगेच बदलू शकता. याच पर्यायाचा वापर करून Multi Window पाहता येतील.   
Multi Window (कॅमेरा आणि अलार्म App एकाचवेळी )
  • डार्क मोड : लॉलीपॉपमध्ये अँड्रॉइड मेन्यू केवळ पांढर्‍या रंगाच्या पार्श्वभूमीवरच होता मात्र आता पुन्हा गडद रंगाची सोय देण्यात्त आली आहे!
  • आपत्कालीन माहिती लॉकस्क्रीनवरच !: आता आपल्याविषयी माहिती लॉकस्क्रीनवरच दाखवता येणार असून समजा आपण काही अपघातात सापडलो तर इतर लोक आपल्या माहितीद्वारे आपल्या संबंधितांशी संपर्क साधू शकतील! हे फीचर नक्कीच खुप फायदेशीर ठरणार आहे.
हा प्रीव्यू सध्या तरी प्राथमिक अवस्थेत असून अंतिम ओएस मध्ये अनेक नवे बदल जोडले जाऊ शकतात. सध्यातरी अँड्रॉइडचं हे नवं रूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलं जातंय.


नवे बदल पाहण्यासाठी विडियो लिंक : https://youtu.be/ODnhoFU_9Q0
Exit mobile version