मायक्रोसॉफ्ट शैक्षणिक कार्यक्रम : विंडोज १० एस व सर्फेस लॅपटॉप सादर!

मायक्रोसॉफ्टच्या कालच्या MicrosoftEDU या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना समोर ठेऊन बनवलेली उत्पादने सादर केली आहेत. यामध्ये विंडोज १० एस नावाची ऑपरेटिंग सिस्टम, मायक्रोसॉफ्ट सर्फेस लॅपटॉप, माइनक्राफ्ट बद्दल नवे पर्याय, विंडोज १० मधील मिक्स्ड रियालिटी सोयी याबद्दल माहिती दिली.

पर्सनल कम्प्युटरची कमी होत चाललेली विक्री आणि स्मार्टफोन बाजारातसुद्धा जम बसत नसल्यामुळे मायक्रोसॉफ्टने सध्या बरेच नवीन हार्डवेअर उत्पादने स्वतःच बाजारात आणायला सुरुवात केली आहे. यापूर्वी सर्फेस प्रो टॅब्लेट्स, सर्फेस बुक हा हायब्रिड लॅपटॉप(टॅब्लेट व लॅपटॉप दोन्ही असलेला) व काही महिन्यांपूर्वी सादर झालेला बहुचर्चित सर्फेस स्टुडिओ डेस्कटॉप कम्प्युटर. या उत्पादनांनी अॅपलच्या मॅक आणि आयपॅडसोबत स्पर्धा सुरु केली आहे.

गूगल क्रोमबुक हा अलीकडे पाश्च्यात्य देशांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध झालेला लॅपटॉप जो केवळ क्रोम ब्राउजरचा वापर करतो आणि यामध्ये खास बनवलेली क्रोम ओएस आहे. अनेक शाळा कॉलेज यांनी क्रोमबुक विद्यार्थ्यांना पुरवणं सुरु केलं आहे. ही बाजारपेठ निसटताना पाहून मायक्रोसॉफ्टने क्रोम ओएसला पर्याय अशी विंडोज १० एस (Windows 10 S) ही नेहमीच्या विंडोज १० पेक्षा काही बाबतीत वेगळी असलेली ऑपेरेटिंग सिस्टिम सादर केली आहे. यामध्ये केवळ विंडोज स्टोरमध्ये उपलब्ध असलेले अॅप्सच वापरता येतील.

विंडोज १० एस सुविधा/Features :
• या ओएसला बूट होऊन सुरु होण्यास फार कमी कालावधी लागतो
• यामध्ये मायक्रोसॉफ्टची सुरक्षा अंतर्भूत आहे.
• या ओएसमध्ये बॅटरी अधिक टिकते असा दावा मायक्रोसॉफ्टने केलं आहे
• यामध्ये ऑफिस ३६५ सारखे अॅप्स उपलब्ध.
• जर इतर नेहमीची सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची असतील तर विंडोज १० प्रो 50$ मध्ये लगेच जोडता येतं!

Microsoft Surface Laptop
मायक्रोसॉफ्ट सर्फेस लॅपटॉप हा मायक्रोसॉफ्टचा नवा लॅपटॉप असून विद्यार्थ्यांना समोर ठेऊन तसेच सामान्य वापर असणाऱ्या वापरकर्त्यांना सुद्धा चांगला पर्याय मिळावा म्हणून हा सादर केला गेला आहे. याची बॅटरी तब्बल १४.५ तास टिकेल म्हणजे अॅपल मॅकबुक प्रो पेक्षा २ तास अधिक!
फीचर्स :
प्रोसेसर : i5/i7
स्क्रिन : 13.5” PixelSense™ Display
रेसोलुशन : 2256 x 1504 (201 PPI)

रॅम : 4GB/8GB/16GB
SSD : 128GB/256GB/512GB
बॅटरी : १४ तास टिकेल इतकी बॅटरी (सर्वाधिक असल्याचा दावा)
पोर्ट : USB 3.0, Headset jack, Mini DisplayPort, Surface Connect, Compatible with Surface Dial

किंमत : 999$/1599$/2199$
शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त घोषणा : हा कार्यक्रम मुळात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सुरू असलेल्या मायक्रोसॉफ्ट एड्युकेशनचा होता. यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये योग्य देवाणघेवाण व्हावी यासाठी मायक्रोसॉफ्टTeams या सुविधेची घोषणा करण्यात अली असून याद्वारे अनेक विद्यार्थी एका प्रबंधावर काम करणे एकाच वेळेला एका डॉक्युमेंटवर अनेकांना टाईप करता येणे अशा सोयी यामध्ये आहेत. शिक्षक कोणत्याही क्षणी विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत संवाद साधू शकतात. शाळेतील सर्व पीसी एकाच पेनड्राईव्हद्वारे काही मिनिटात सेटअप करता येतील जेणे करून सर्वच पीसीवर सारख्याच सेटिंग्स असतील!

dyslexia हा आजार असलेल्या मुलांसाठी त्यांनी मजकूर अधोरेखित करून त्यांच्यातील अंतर वाढवून त्यांना समजण्यास व वाचन/लेखन शिकण्यास मदत होईल असे बदल केले आहेत! शिवाय 3D तंत्रामध्ये शिकण्यासाठी होलोलेन्स, हेडसेट्सयामध्ये देखील नव्या सोयी देण्यात आल्या आहेत जेणेकरून मंगळ ग्रहाच वातावरण अशा गोष्टी तेथे उभे असल्यासारखे पाहत अनुभवता येतात! शरीरशास्त्राचा अभ्यास तर बदलूनच जाईल!

खालील व्हिडिओ पहा

दुसरा व्हिडिओ Technology innovation helps students take their learning to new heights

इतर घोषणा :
• माइनक्राफ्ट ह्या प्रसिद्ध गेममध्ये आता कोड बिल्डरचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी गेम खेळता खेळता कोडिंग शिकू शकतील! (Minecraft for Education Edition)

• मिक्स्ड रिऍलिटीच्या माध्यमातुन विंडोज १० मध्ये नवे अनुभव घेता येतील. जसे कि कॉम्पुटरवर एखाद्या वस्तूचे 3D मॉडेल पाहत असू तर त्याचा खऱ्या आयुष्यातील आकार आपण कॅमेरा द्वारे फोटो काढून त्यामध्ये ती वस्तू ठेऊन पाहू शकतो!  तसेच हे मॉडेल तयार करण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्टचं मोफत उपलब्ध असलेलं पेंट 3D वापरू शकतो जे आता विंडोज १० क्रिएटर्स अपडेटमध्ये उपलब्ध होतं. 
Exit mobile version