शायोमी रेडमी 5A सादर : स्वस्त फोन्समध्ये आणखी एकाची भर

शायोमी या कंपनीने भारतात स्वस्त फोन्स सादर करून मिळवलेली आघाडी कायम ठेवायच्या हेतूने नवा स्मार्टफोन आणला असून रेडमी 5A असं या फोनचं नाव आहे. शायोमीच्या नव्या फोन मालिकेत हा सर्वात स्वस्त फोन असून बऱ्यापैकी सुविधा देऊन इतरांना स्पर्धेत मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहे. रुपये ४९९९ मध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर, ३००० mAh बॅटरी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत!
देश का स्मार्टफोन ही टॅगलाईन वापरून त्यांनी फोनचं मार्केटिंग सुरु केलं आहे. हा फोन भारतात बनवला जाणार असून मेड इन इंडिया म्हटला जाईल. यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर असून ज्याद्वारे आपण घरातील टीव्ही, एसी, म्यूजिक प्लेयर अशी रिमोट लागणारी उपकरणे या फोनद्वारे नियंत्रित करू शकतो! जिओ ग्राहकांना अधिक १००० रुपये कॅशबॅक मिळेल!

RedMi 5A सुविधा :
डिस्प्ले : 5″ एचडी 1281×720 रिसोल्युशन, 296 PPI
प्रोसेसर : Snapdragon 425 quad-core 1.4GHz max
GPU : Adreno 308 500MHz
रॅम आणि मेमरी  :  2GB + 16GB किंवा 3GB + 32GB, Expandable storage upto 128GB
बॅटरी : 3000mAh Non-removable 5V/1A charging
कॅमेरा (मुख्य) : 13MP, 5-element lens, ƒ/2.2 aperture
कॅमेरा (फ्रंट) : 5 megapixel, ƒ/2.0 large aperture, 1080p/720p video, 30fps
नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी : 4G network ड्युयल सिम स्लॉट + Dedicated microSD slot, Bluetooth 4.1
सेन्सर्स : Infrared, Accelerometer, Proximity sensor, Ambient light sensor
वजन  : 137 g
किंमत : 2GB + 16GB : ₹४९९९ आणि 3GB + 32GB : ₹६९९९
फ्लिपकार्टवर ७ डिसेंबरपासून उपलब्ध : http://fkrt.it/KPoeiTuuuN

काही दिवसांपूर्वी शाओमीने पॉवरबॅंक्स सुद्धा सादर केल्या होत्या ज्या पूर्ण भारतात बनवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं असून GST बदलानंतर यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. या पॉवर बॅंक्स चार्जसुद्धा लगेच होतात आणि फोन्स चार्ज करतात सुद्धा लगेच! (Quick Charge 3.0) एकावेळी दोन फोन चार्ज करता येतात!
Mi PowerBank 2i : 10000mAh  ₹७९९ आणि 20000mAh ₹१४९९

Exit mobile version