ओलाने केलं फुडपांडा इंडियाचं अधिग्रहण : भारतातील कारभार आता ओलाकडे!

ओला या कंपनीने (ANI Technologies Operated) फुडपांडा इंडिया या स्टार्टअपचं अधिग्रहण केलं आहे. फुडपांडा कंपनी अॅपद्वारे फुड डिलिव्हरी सेवा पुरवते. सध्या ही फुडपांडा जर्मन कंपनी Delivery Hero AG यांच्याकडे आहे. 200 मिलियन डॉलर्स मध्ये आता ओला फुडपांडा इंडियाचा भारतातील कारभार ताब्यात घेईल!
या करारानुसार कंपनीचे शेअर्स ओलाकडे दिले जातील.

या करारामुळे ओलाचा फूड डिलिव्हरी क्षेत्रात प्रवेश झाला असून त्यांची आता स्वीगी, झोमॅटो, उबरईट्स यांच्याशी स्पर्धा असेल. ओलाने यापूर्वी ओला कॅफेद्वारे या क्षेत्रात अयशस्वी प्रयत्न केले होते.     
आमच्या फुडपांडामधील 200 मिलियन डॉलर्स गुंतवणुकीमुळे वाढीवर लक्ष देऊन ग्राहक आणि भागीदारांना लाभ होईल. अशी घोषणा ओला कार्यक्रारी प्रमुख आणि संस्थापक भावीश अगरवाल यांनी केली.   
यानिमित्ताने सौरभ कोचर सध्याचे सीईओ पायउतार होत असून तात्पुरते सीईओ म्हणून प्रणय जीवराजका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वीच ओलाने सॉफ्टबँक आणि टेन्सेन्ट यांच्याकडून 1.1 बिलियन डॉलर्स उभारले होते.

याविषयी अधिकृत माहितीसाठी लिंक : Ola and FoodPanda Deal

Exit mobile version