गूगलचं फाइल शेयरिंग अॅप फाइल्स गो आता अधिक वेगवान!

गूगलचं इंटरनेटशिवाय फाईल शेअर करण्यासाठी, गरज नसलेल्या फाईल्स डिलीट करण्यासाठी व फाईल्स पाहण्यासाठी असलेला Files Go हा मॅनेजर आता चौपट वेगाने फाईल्स पाठवेल! 
या नव्या अपडेटमुळे वेगामध्ये मोठी वाढ करून आधीच्या व्हर्जनपेक्षा चौपट वेग  म्हणजे 490 Mbps पर्यंत वेगाने ट्रान्सफर होईल! १०० फोटो अवघ्या काही सेकंदात जातील. याबद्दल जुना लेख

कनेक्शन सुरु करण्यासाठी फार वेळ लागायचा तो सुद्धा कमी केला असल्याचं गूगलने सांगितलं आहे.
आता या अपडेटपासून एक स्वतंत्र शेअर टॅब देण्यात आली असून ऑफलाईन फाईल पाठवणं सोपं जाईल. अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0 पासून पुढील अँड्रॉइड व्हर्जन्ससाठी हे अॅप उपलब्ध आहे!.

Files Go डाऊनलोड लिंक : Files Go on Google Play

सुरक्षिततेवर सुद्धा भर देण्यात आला असून सर्व युजर्सना सर्व कनेक्शनसाठी व्हेरिफाय करावं लागेल जेणेकरून योग्य व्यक्तीकडेच ती फाईल शेअर केली जाईल सोबत डेटा ट्रान्सफर एनक्रिप्टसुद्धा केलेला असेल!

search terms : how to use files go update speed data transfer 

Exit mobile version