MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

गूगल फॉर इंडिया : गूगल गो, मॅप्सवर दुचाकी मोड, फाइल्स गो सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 6, 2017
in Events, ॲप्स

गूगलच्या खास भारतासाठी आयोजित गूगल फॉर इंडिया या कार्यक्रमाच्या तिसर्‍या पर्वात त्यांनी अनेक नव्या गोष्टींची घोषणा केली. भारतीय वापरकर्त्यांची गरज ओळखून व अधिकाधिक लोकांना इंटरनेट, स्मार्टफोन्स वापरता यावेत या उद्देशाने या नव्या उत्पादनांची घोषणा केल्याच यावेळी सांगण्यात आलं.
गूगल मॅप्सवर दुचाकी (Two Wheeler) मोड, गूगल तेजमध्ये बिल भरण्याची सोय, अँड्रॉइड ओरीओ गो, गूगल गो, फाईल्स गो, जिओफोनवर गूगल असिस्टंट या सर्वांबद्दल जाणून घ्या आजच्या या लेखात…

अँड्रॉइड ओरीओ गो : कमी रॅम व कमी स्टोरेज असलेल्या फोन्सना शक्यतो जे सर्वात नवं अँड्रॉइडची आवृत्ती (version) असतं ते मिळत नाही. मात्र आता ही उणीव भरून काढण्यासाठी गूगलने अँड्रॉइड ओरीओ 8.1 ची अँड्रॉइड ओरीओ गो नावाने आवृत्ती आणली असून त्यामुळे कमी किंमतीच्या/ जुन्या हार्डवेअर असलेल्या फोन्सवर सुद्धा सगळ्यात नव्या अँड्रॉइडचा आनंद घेता येईल!
512MB ते 1GB रॅम असलेल्या फोनवर अधिक चांगला वापर होईल या दृष्टीने केलेले बदल असतील सोबत
गूगल गो, गूगल असिस्टंट फॉर अँड्रॉइड ओरीओ गो सुद्धा जोडलेला असेल! या अँड्रॉइडमधील प्ले स्टोर देखील या फोन्ससाठी योग्य असे अॅप्सच सुचवेल! ही आवृत्ती २०१८ च्या सुरुवातीला उपलब्ध होईल. अधिक माहिती

Google Go

गूगल गो : कमी क्षमतेच्या फोन्ससाठी आता गूगल अॅपची स्वतंत्र आवृत्ती गूगल गो या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असून हे नवं अॅप कमी जागा, कमी इंटरनेट वापर करत गूगल सर्च रिझल्ट्स दाखवेल!
प्रथमच इंटरनेटचा वापर सुरु करणाऱ्या यूजर्सना समोर ठेऊन या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
या अॅपची साईझ 5 MB पेक्षा कमी आहे आणि यामुळे सर्चसाठी ४०% इंटरनेट डेटा वाचेल! भारत आणि इंडोनेशियामधील वापरकर्त्यांसाठी हे अॅप चाचणी स्वरूपात उपलब्ध झालं आहे!

Google Go Download Link : https://g.co/googlego
Files Go

फाईल्स गो : फोनवर जागा मोकळी करा! या नव्या अॅपमुळे फोनवर गरज नसलेल्या फाईल्स काढून टाकणे, जुने-कमी गुणवत्तेचे फोटो, व्हॉटसअॅपचे गरज नसलेले फोटो काढून टाकणे,  फोनचं स्टोरेज तपासणे, फाईल्स शोधणे अशा सुविधांचा उपयोग करता येईल! डाउनलोड लिंक : Files Go on Google Play
हे अॅप शेअरइट सारखे वापरण्यासाठी Files पर्याय निवडा मग Send त्यानंतर पाठवायची असलेली फाईल निवडा आणि Send करा. ज्यांना पाठवायची आहे त्यांना Receive करायला सांगा. Connect करा आणि फाईल ट्रान्सफर सुरु होईल! (यासाठी दोघांकडे Files Go हे अॅप असायला हवं)

वायफायद्वारे इंटरनेटशिवाय फाईल्स पाठ्वण्यासाठी  फाईल्स गो अॅप शेअरइट, झेंडर अशा अॅपला पर्याय म्हणूनसुद्धा वापरता येईल!

Google Assistant on JioPhone

गूगल असिस्टंट आता जिओफोनवर! : भारतासाठी खास प्रथमच गूगल असिस्टंट एका फिचर फोनवर उपलब्ध करून देण्यात आला आहे! जिओफोनवर हा आल्यामुळे इंग्लिश, हिंदी भाषांचा वापर करत या असिस्टंटसोबत संवाद साधून उत्तरे मिळवता येणार आहेत! फोन कॉल्स करणे, गाणी/चित्रपट लावणे,इंटरनेटवर शोध घेणे अशी कामे हा असिस्टंट करू शकतो. Myntra, एसबीआय, बुकमायशो, गोआयबिबो, एचडीएफसी अशा अॅप्सचा समावेश आता गूगल असिस्टंट अॅक्शन्समध्ये करण्यात आला आहे!

Two Wheeler mode on Google Maps

गूगल मॅप्सवर दुचाकी मोड! (Two Wheeler Mode) : गूगल मॅप्स वापरताना पूर्वी सायकल, कार, कॅब आणि बस/रेल्वे अशा सार्वजनिक वाहतुकीचेच पर्याय होते, मात्र आता दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पर्याय देण्यात आला असून यामुळे दुचाकी प्रवास आणखी सोपा होईल. ही सुविधासुद्धा भारतात प्रथम आणली गेली असून यामुळे कारसारख्या वाहनांना उपलब्ध नसलेले शॉर्टकट्स सुद्धा दाखवेल!

यापूर्वी पुण्यात दुचाकी वाहनांना बंदी असलेल्या लकडी पूल/ संभाजी पूल ठिकाणी गूगल मॅप्स मुळे बऱ्याच जणांची फसगत व्हायची मात्र आता या मोडमध्ये वेगळा रस्ता दाखवला जातोय!


गूगल तेजवर बिल भरणा
: सध्या केवळ पैसे पाठवण्या/स्वीकारण्यापर्यंतच मर्यादित असलेली गूगल तेज हि UPI सेवा आता ७० हुन अधिक प्रकारची बिलं भरण्यासाठी वापरता येईल! गॅस, वीज, ब्रॉडबँड, DTH या सर्वांची बिलं भरता येतील. याबरोबर एकदा बिल भरल्यास पुढच्या वेळी गूगल तुम्हाला बिल भरण्यासाठी आठवण करून देत राहील! एक कोटीहुन अधिक लोक आता गूगल तेजचा वापर करत असून चौदा कोटी व्यवहार केले गेले आहेत! गूगल तेज डाउनलोड लिंक : Google Tez

यावेळी काही इतर गोष्टींबद्दल माहिती दिली गेली जसे की इंटरनेट साथी या महिलांना इंटरनेट वापरास मदत करणाऱ्या उपक्रमाबद्दल, काही भारतीय स्टार्टअप्समध्ये गूगलने केलेली गुंतवणूक, रेलवायर या रेल्वे स्टेशन्सवरील वायफाय सेवेबद्दल सोबत काही बिझनेस ग्राहकांना उपयोगी ठरलेली उत्पादने, भारतात यूट्यूबचा वाढलेला वापर.

search terms Google for India Android Oreo Go Google Go Files Go Google Maps Two Wheeler Mode Google Tez Bill Payments Google Assistant JioPhone

ADVERTISEMENT
Tags: AndroidAppsAssistanceGoogleMapsOperating SystemsUPI
ShareTweetSend
Previous Post

गूगल प्ले २०१७ : सर्वोत्तम अॅप्स व गेम्स जाहीर!

Next Post

गूगल इयर इन सर्च : २०१७ मध्ये भारतीयांनी ‘हे’ केलं सर्च!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

May 11, 2023
ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

May 10, 2023
Next Post
गूगल इयर इन सर्च : २०१७ मध्ये भारतीयांनी ‘हे’ केलं सर्च!

गूगल इयर इन सर्च : २०१७ मध्ये भारतीयांनी 'हे' केलं सर्च!

Comments 3

  1. Anonymous says:
    5 years ago

    Nice Article, Best Tech Blog in Marathi…
    this will be good Website in Marathi for all tech news

    Reply
  2. Ramesh says:
    5 years ago

    Google for India is nice initiative. Android Oreo Go how to get it ? will it be for older phones too?

    Reply
  3. SURESH JOSHI says:
    5 years ago

    गुगलनं काय नविन काढलयं याची अद्ययावत माहिती देणं म्हणजे आमच्यासाठी तुम्हीच गुगल ! वा छान

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!