इंस्टाग्रामवर स्टोरीजमध्ये प्रश्न विचारण्याची नवी सोय! : यूजर्ससाठी आणखी एक फीचर!

इंस्टाग्राम या प्रसिद्ध फोटो शेअरिंग अॅपमध्ये अलीकडे बर्‍याच नव्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. फेसबुककडे मालकी असलेल्या इंस्टाग्रामने अलीकडेच तासभर लंबी असलेले व्हिडिओ पोस्ट करण्याची सोय असलेलं IGTV अॅप सादर केलं होतं.  आता त्यांनी Questions for Stories ही नवी सोय आणली असून ज्याद्वारे यूजर एखादा प्रश्न विचारा असं त्यांच्या स्टोरीद्वारे सांगू शकतात त्यावर त्यांचे  फॉलोअर्स त्यांना कोणतेही प्रश्न विचारू शकतात आणि मग यूजर उत्तर वेगळ्या स्टोरीद्वारे शेअर करू शकतो. मात्र त्या स्टोरीमध्ये ज्या फॉलोअर्सनी प्रश्न विचारला त्यांचं नाव दिसणार नाही. हे Question स्टीकर वेगवेगळे रंग/फॉन्ट लावून एडिट करता येतं.  इंस्टाग्रामची ही पोलिंग सुविधेमधील Question स्टीकरची सोय लोकप्रिय होताना दिसत आहे.   

स्टीकर ड्रॉअर मध्ये जाऊन Question निवडा प्रश्न टाइप करा आणि पोस्ट करा. जेव्हा मित्र/फॉलोअर्स पाहतील तेव्हा ते त्यावर उत्तरे देऊ शकतील किंवा त्या स्टोरी पोस्टवर प्रश्नसुद्धा विचारू शकतील आणि हे प्रश्न कोणी विचारले ते इतरांना दिसणार नाही मात्र त्यावरील आपण दिलेली उत्तरे पुढील स्टोरीद्वारेच दिसतील 

search terms instagram stories questions features sticker

Exit mobile version