डेटा ट्रान्सफर सोपं व्हावं म्हणून गूगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटर आले एकत्र!

आपल्या वेगवेगळ्या उपकरणांमध्ये डेटा ट्रान्सफर करणं कधीकधी जिकिरीचं होऊन जातं प्रत्येक प्लॅटफॉर्म अँड्रॉइड, विंडोज सारख्या ऑपरेटिंग सिस्टिम असतील किंवा फेसबुक, ट्विटर सारख्या वेबसाईट्स प्रत्येकाची वेगळी पद्धत आणि गरज यामुळे बराच वेळ सुद्धा जातो. यावर आता एका नव्या प्रकल्पामध्ये या कंपन्यानी एकत्र येऊन विविध सेवांमध्ये डेटा ट्रान्सफर सोपं व्हावं या उद्देशाने डेटा ट्रान्सफर प्रोजेक्टची सुरुवात केली आहे!
वेगवेगळ्या सेवांमधून डेटा ट्रान्सफर करणं सोपं व्हावं हा या प्रकल्पाचा उद्देश. उदा. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वनड्राइव्ह मधील फोटो गूगल फोटोजमध्ये घेऊ शकाल. यामध्ये कोणतीही इच्छुक कंपनी सहभागी होऊ शकते आणि त्यांचा सपोर्ट जोडू शकते! हा प्रकल्प मुक्त स्रोत म्हणजेच ओपन सोर्स आहे. या प्रकल्पाच्या सध्या चाचण्या सुरु आहेत.

डेटा ट्रान्सफर प्रोजेक्ट  कसं काम करेल? : सध्याचे API (Application programming interface) वापरून एकमेकांच्या प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर ची सुरुवात होईल जेणेकरून वापरकर्त्याला सहज हे काम करता येईल. ज्यामुळे यूजर त्याचा डेटा एका प्लॅटफॉर्मवरून दुसरीकडे गरजेनुसार हलवू शकेल! डेटा बॅकअपसाठी मोठीच सोय होईल आणि यूजर हव्या त्या सेवेमधे उर्वरित डेटा साठवू शकेल.

DTP (Data Transfer Project) च्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सर्वाना उपलब्ध करून देण्यात येईल. ओपन सोर्स असल्यामुळं यामध्ये अनेक कंपन्या सहभागी होऊ शकतील आणि यूजर एकाच प्रकारच्या सेवेसाठी वेगवेगळ्या कंपन्याच्या सेवा वापरून पाहू शकतील!

Data Transfer Project अधिकृत वेबसाइट

search terms data transfer project google facebook microsoft twitter 

Exit mobile version