सोनीने जाहीर केला आहे ४८ मेगापिक्सल स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर!

सोनी स्मार्टफोन कॅमेरा क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यांचे कॅमेरा सेन्सर बर्‍याच फोन्समध्ये वापरलेले असतात. अगदी अॅपलचा आयफोन, शायोमी, वनप्लस यांच्या फोन्समध्ये सुद्धा सोनीचेच कॅमेरा सेन्सर असतात! आता या कंपनीने IMX586 हा सेन्सर सादर केला असून हा सुपर हाय रेजोल्यूशन देऊ शकेल जो कमी उजेडात सुद्धा उत्तम फोटो काढू शकेल! IMX586 मध्ये 48MP मेगापिक्सेल सेन्सर आहे जो पूर्वीच्या Huawei P20 Pro च्या 40MP आणि Lumia 1020 च्या 41MP ला मागे टाकेल! त्या पूर्वी नोकीया 808 PureView मध्ये सुद्धा तब्बल 41MP सेन्सर होता! दिवसा काढलेल्या फोटोमध्ये सुस्पष्ट दृश्य टिपता येईल तेसुद्धा बारीक गोष्टी व्यवस्थित दिसतील अशा स्वरूपात!

 IMX586 जवळच्या चार 0.8 micron pixels ना एका पिक्सल मध्ये रूपांतरित करतो ज्यामुळे कमी उजेडात कमी रेजोल्यूशन असलेली मात्र चांगल्या गुणवत्तेची इमेज मिळेल सोनीच्या म्हणण्यानुसार यामुळे रात्री वापरता येईल असा 12MP 1.6 micron pixel कॅमेरा मिळतोय

डावीकडे कमी उजेडावेळी तर उजवीकडे दिवसा घडणाऱ्या प्रक्रियेचं चित्र 

सोनीच्या माहितीनुसार सध्याच्या कॅमेरा सेन्सरपेक्षा चौपट डायनॅमिक रेंज IMX586 sensor मध्ये पाहायला मिळेल! ज्यामुळे सर्व इमेज तपशीलवार आणि सुस्पष्ट दिसेलच. सप्टेंबर २०१८ पासून हा कॅमेरा सेन्सर बाजारात उपलब्ध होईल. (फोन निर्मात्यांसाठी) याचा अर्थ २०१९ च्या टॉप फ्लॅगशिप फोन्समध्ये हा सेन्सर नक्की पाहायला मिळेल!       

अधिकृत माहिती : IMX586 48Megapixels CMOS Image Sensor

search terms Sony 48MP IMX586 CMOS world’s highest resolution smartphone camera sensor

Exit mobile version