म्युझिकली (Musical.ly) अॅप आता बंद : टिकटॉक अॅपला जोडले जाणार!

अल्पावधीच प्रसिद्ध झालेलं अॅप म्युझिकली (Musical.ly) आता बंद होणार असून लोकप्रिय गाणी संवाद वापरुन त्यामध्ये आपला स्वतःचा व्हिडिओ जोडून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची संकल्पना बर्‍याच जणांना आवडली होती (अर्थात बर्‍याच जणांना नव्हती…!).  प्ले स्टोअरवर  तब्बल १० कोटी डाऊनलोड्स तसेच  माध्यमांतून अनेक यूजर्स या अॅपसोबत जोडले गेले होते. आता हे सर्व यूजर्स टिकटॉक (TikTok) या अॅपमध्ये समाविष्ट केले जातील. हे सुद्धा Bytedance या चिनी कंपनीने बनवलेलं व्हिडीओ अॅप असून बाईटडान्सनेच काही दिवसांपूर्वी Musical.ly चं अधिग्रहण केलं आहे. आता ज्यावेळी तुम्ही Musical.ly अपडेट कराल त्यावेळी तुमचं अकाउंट आणि डेटा आपोआप टिकटॉकवर आलेला दिसेल.   

Download Link : TikTok On Play Store : TikTok on iTunes             

TikTok App

बाईटडान्सने Musical.ly चं जवळपास 1 बिलियन डॉलर्सना (~६८०० कोटी रुपये!) गेल्या नोव्हेंबरमध्ये अधिग्रहण झालं आणि जून महिन्यात यावर प्रक्रिया होण्यास सुरुवात झाली. इमोजी, फिल्टर्स आणि त्यासोबत संगीताची/संवादांची जोड आता नव्या अॅपवर सुरु होईल. खरे पाहता भारतात म्युझिकलीचे व्हिडीओ म्युझिकलीवर कमी आणि इंस्टाग्रामवर जास्त दिसतात! दरम्यान अलीकडेच अशी चर्चा सुरु आहे की फेसबुक त्यांचं Musical.ly च्या तत्वावर काम करणारं म्युझिक आधारित टॅलेंट शो आणणार आहे.

search terms : musical.ly acquared by bytedance musically users move to tiktok app 

Exit mobile version