फेसबुकच्या ५ कोटी यूजर्सचं अकाऊंट हॅक ! : सुरक्षेमधील बगमुळे अकाऊंटचा ताबा घेणं शक्य!

फेसबुकने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार तब्बल ५ कोटी वापरकर्त्यांचं अकाउंट हॅक झालं असून सुरक्षेमधील एका त्रुटीमुळे एव्हढ्या यूजर्सच्या अकाउंट्स धोक्यात सापडली आहेत! २५ सप्टेंबर २०१८ रोजी फेसबुकला या त्रुटींबद्दल माहिती मिळाली असून या सर्वाना फेसबुकने त्यांच्या खात्यावरून लॉगआऊट केलं आहे.

हे प्रकरण फेसबुकने गंभीरपणे घेतलं असून ह्या त्रुटी दूर करून सरकारी संस्थांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे.  सुरक्षित पाऊल म्हणून फेसबुक ज्यांच्या अकाउंटवर ही त्रुटी/Bug आढळला त्या सर्वाना Logout केलं असून सोबत काळजी म्हणून आणखी ४ कोटी यूजर्सचं अकाउंट सुद्धा लॉगआऊट केलं आहे

हा बग फेसबुकच्या View As नावाच्या सोयीसंबंधित असून या सोयीद्वारे आपण दुसऱ्या कोणी आपली प्रोफाइल पाहिली तर ती कशी दिसेल हे दाखवलं जातं मात्र हॅकर्सनी यामध्ये त्रुटी शोधून काढली. ह्या View As सुविधेमध्ये यूजरना एक सिक्युरिटी टोकन दिलं जातं जे काम असं करत आपल्याला सर्वेली लॉगिन करावं लागू नये. हॅकर्सनी या टोकनमधील त्रुटी शोधून जर यूजरने View As वर क्लिक केलं तर यूजरची प्रोफाइल दुसऱ्या ठिकाणाहून पाहता येईल असा मार्ग शोधला होता!

अशा प्रकारे नोटिफिकेशन दिसेल

लॉगआऊट करण्यासोबत फेसबुक सध्या ही View As सुविधा सुद्धा तात्पुरती बंद करत आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार ते सध्या चौकशी करत असून यादरम्यान हॅक झालेल्या अकाउंटचा काही चुकीचा वापर करण्यात आला आहे का हे तपासत आहेत. या हॅकमागे कोण होतं किंवा कोठून करण्यात आलं याची सध्या माहिती नसल्याचंही सांगण्यात येत आहे.

जर तुमचं अकाउंट आज आपोआप लॉगआऊट झालं असेल तर ते त्या हॅकमध्ये समाविष्ट आहे किंवा खबरदारी म्हणून हे अकाउंट लॉग आऊट करण्यात आलं आहे असं समजा. ही त्रुटी पासवर्ड संबंधित नसल्यामुळे फेसबुक अजूनतरी यूजर्सना नवा पासवर्ड सेट करण्यास सुचवलं नाहीये, फक्त लॉगआऊट केलं आहे ज्यामुळे ज्यांना आपोआप लॉगआऊट झाल्याचं दिसत आहे त्यांनी पुन्हा लॉगिन करावं. हे प्रकरण थेट हॅकमध्ये मोडत नसून सिक्युरिटी ब्रीच या प्रकारचं आहे. मात्र तरीही बरेच दिवस आपण पासवर्ड बदलला नसेल तर नक्की बदला.
फेसबुक, ट्विटर, गूगलच्या अकाउंट सुरक्षेसाठी कोणती पावले उचलावीत याबद्दल आमचा लेख

या हॅकबद्दल फेसबुकची अधिकृत पोस्ट : Facebook Newsroom Security Update 

अगदी दोन चार दिवसांपूर्वीच एका तैवानी हॅकरने मार्क झकरबर्गचं अकाउंट हॅक करणार असल्याच जाहीर केलं आणि आणि तो चक्क हे लाईव्ह स्ट्रीमद्वारे जगाला दाखवणार असे सांगत आहे! असं झालं तरी ही काही पहिली वेळ नसेल कारण यापूर्वीही एका सिक्युरिटी रिसर्चरने झकरबर्गच्या अकाउंटवर स्टेट्स टाकून दाखवला होता!

दरम्यान फेसबुक या घटनेबद्दल पोस्ट करणाऱ्या यूजर्सच्या पोस्ट्स काढून टाकत असल्याचंही बऱ्याच जणांनी आता स्क्रिनशॉट्स टाकून दाखवलं आहे जी नक्कीच चांगली गोष्ट नाहीये. 

search terms facebook announces 50 million facebook accounts were hacked in vulnerability security breach logged out 

Exit mobile version