iOS 12 अपडेट आता उपलब्ध : आयफोन्समध्ये नव्या सोयी!

iOS 12 Download Marathi

अॅपलच्या WWDC म्हणजे Worldwide Developers Conference कार्यक्रमात सॉफ्टवेअर बाबतीत बर्‍याच नव्या घोषणा करण्यात आल्या होत्या. iOS 12 अपडेबद्दल सुद्धा त्याच वेळी माहिती देण्यात आली होती! आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया कोणत्या नव्या गोष्टींचा समावेश या अपडेटद्वारे करण्यात आला आहे… 

iOS 12 : आयओएस ही ऑपरेटिंग सिस्टम आयफोन आणि आयपॅड टॅब्लेटसाठी काम करते. या नव्या अपडेट मध्ये iOS अधिक वेगवान केल्याचा दावा अॅपल केला आहे. हे नवं अपडेट पुढील फोन्स व टॅब्लेटसाठी उपलब्ध होत आहे : iPhone X, iPhone 8 & 8 Plus, iPhone 7 & 7 Plus, iPhone 6S & 6S Plus, iPhone SE, iPhone 6 & 6 Plus, iPhone 5S, iPad Pro (9.7-inch, 10.5-inch & 12.9-inch), iPad (2018), iPad (fifth-gen), iPad Air & iPad Air 2, iPad mini 2, 3 & 4, iPod Touch (sixth-gen)  
iOS 12 अपडेट आता डाउनलोड करण्यासाठी सर्वाना उपलब्ध असून वरील यादीत तुमचा फोन/टॅब्लेट असेल तर तुम्ही Settings app > General > Software Update मध्ये जाऊन अपडेट सुरु करू शकता.  

iOS 12 मधील बदल

  • सिरी शॉर्टकट्स : यामुळे आता सिरी या अॅपलच्या व्हॉइस असिस्टंटमध्ये काही गोष्टींसाठी आपण स्वतः शॉर्टकट तयार करून नंतर सिरीला त्याबद्दल विचारू शकतो!
  • सिरी सजेशन्स : यामुळे सिरी आपण स्पॉटलाईट सर्च सुविधेचा वापर केला असल्यास पुढे काही गोष्टी सिरी स्वतःहुन सुचवेल आपण नुकत्याच केलेल्या क्रियेचा अभ्यास करून हे सजेशन दिलं जाईल. 
  • अॅनिमोजी व मेमोजी : Animoji व Memoji : Animoji मध्ये आणखी काही नव्या Animoji उपलब्ध करून देण्यात आल्या असून मेमोजी जे सॅमसंगच्या AR इमोजी प्रमाणे काम करत ज्यात आपण आपल्या स्वतःच्या चेहऱ्याप्रमाणे Animoji तयार करून वापरू शकतो! सोबत iMessage च्या कॅमेराला सुद्धा इफेक्टस देण्यात आले आहेत.    
  • अॅपचा डेटा वापर : पूर्वी केवळ बॅटरी बद्दल असलेलय माहितीसोबत आता प्रत्येक अॅपने वापरलेला डेटा सुद्धा पाहता येईल Settings > Cellular
  • सुधारित स्क्रिनशॉट्स : आयफोन टेनवर बऱ्याच जणांनी चुकून स्क्रिनशॉट काढले जात असल्याची तक्रार केली होती आता यासाठी बदल करण्यात आले आहेत.   
  • सुधारित QR कोड स्कॅनर : आता QR कोड स्कॅनर कंट्रोल सेंटरमध्ये उपलब्ध
  • आयफोन टेनमधील जेस्चर्स आता आयपॅडवर उपलब्ध 
  • बॅटरी मॅनॅजमेन्ट माहिती : बॅटरी फोन नवा असताना कशी होती आणि आता कशी आहे याबद्दल माहिती!
  • पोट्रेट मोडमध्ये सुधारणा 
  • सुधारित पासवर्ड मॅनॅजमेन्ट
  • फेसआयडीमध्ये सुधारणा 
  • Measure अॅप : यामुळे वस्तूंची लांबी मोजणे सोपं झालं आहे. फोनच्या कॅमेराद्वारे सहज करता येईल अशी सोय AR द्वारे साधण्यात आली आहे.               
FaceTime या व्हिडीओ चॅट सुविधेमध्ये एकाचवेळी  तब्बल ३२ जणांशी व्हिडीओ चॅट करता येईल! ही सोय मात्र पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळं या अपडेटमध्ये ही उपलब्ध होणार नाही.  
search terms : iOS 12 update now available for download 
Exit mobile version