शेअरचॅटने उभारले ७२० कोटी : १४ भारतीय भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध

भारतीय भाषांमध्ये व्हिडीओ, विनोद, Quotes असा कंटेंट उपलब्ध करून देणाऱ्या सोशल प्लॅटफॉर्म शेअरचॅट (ShareChat) या अॅपने नुकतेच ७२० कोटींचं ($100 Million) भांडवल उभं केलं असून Shunwei Capital ही आधीची कंपनी सोबत हाँगकाँगमधील Morningside Ventures and Jesmond Holdings या राऊंडमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक केली आहे. यापूर्वी शायोमी, SAIF पार्टनर्स यांची गुंतवणूक आहे. या सर्व गुंतवणुकींमुळे शेअरचॅटचं मूल्यांकन (valuation) $460 million (₹ ३३३२ कोटी) वर पोहोचलं आहे!

सध्या ८० लाख लोक शेअरचॅट वापरत आहेत. हेच प्रमाण एप्रिल महिन्यात ५० लाख होतं! शेअरचॅट मिनी अॅप्स आणण्याची तयारी करत असून याद्वारे गेम्स देण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे!

शेअरचॅट संस्थापक

ही भारतात सुरुवात झालेली कंपनी अंकुश सचदेव, फरीद एहसान आणि भानू सिंग यांनी २०१५ मध्ये सुरु केली आहे. यांचे सध्या ५० कर्मचारी असून १४ भारतीय भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध करून दिला जात आहे.

शेअरचॅट डाउनलोड लिंक : ShareChat On Google Play

search terms sharechat raises 100 million dollar funds powering indian language content marathi  

Exit mobile version