चीन तयार करत आहे कृत्रिम चंद्र : रात्री शहरावर उजेड पाडण्यासाठी प्रकल्प!

होय चिनी शास्त्रज्ञ अवकाशात कृत्रिम चंद्र प्रक्षेपित करणार आहेत. २०२० पर्यंत हा चंद्र पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडला जाईल जो खऱ्या चंद्राच्या आठपट प्रकाशमान असेल! चेंगडू शहर (Chengdu) जे चीनच्या सिचूआन प्रांताची  राजधानी असलेलं शहर आहे इथे रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील पथदिव्यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी व अधिक प्रकाशाने शहर रात्रीसुद्धा उजळण्यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे!

त्या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हा चंद्रापेक्षा आठपट अधिक प्रकाश देऊ शकेल आणि पृथ्वीच्या जवळच जवळपास ५०० किमी अंतरावर फिरत राहील. खरा चंद्र ३,८०,००० किमी दूर आहे. खरेतर या कृत्रिम चंद्राला एक प्रकारचा उपग्रह म्हणता येईल. इतके प्रयत्न केल्यावर सुद्धा पूर्ण आकाश उजळणार नसून पथदिव्यांच्या एक पंचमांश उजेड नक्की पडेल असा विश्वास त्यांना वाटत आहे!
या कृत्रिम चंद्रामुळे चेंगडू शहराचे वार्षिक १२७१ कोटी रुपये वाचतील असा अंदाज त्यांना आहे जर हा प्रकल्प यशस्वी ठरलाच तर २०२२ पर्यंत आणखी चंद्र आकाशात लावण्याच्या प्रयत्नात हे शास्त्रज्ञ असतील!

१९९० च्या आसपास रशियाने असा प्रयत्न कमी उजेड असणाऱ्या शहरांवर केला होता ज्यामध्ये आरशाद्वारे सूर्यप्रकाश परावर्तित करावयाचा होता मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला जजानेवारीत अमेरिकेने असाच प्रयत्न सुरु केला ज्याला शास्त्रज्ञानी विरोध केला असून यामुळे कृत्रिम प्रदूषण वाढीस लागेल आणि पृथ्वीच्या कक्षेत नको असलेली गर्दी वाढेल असं मत व्यक्त केलं आहे. 

टीप : प्रतिकात्मक छायाचित्र वापरलं आहे याची नोंद घ्यावी.  

Exit mobile version