गूगलचं सेफ्टी सेंटर आता भारतात उपलब्ध : अकाऊंट सुरक्षेसंबंधित जागृतीसाठी सोय!

आजकाल आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण सर्वजण किमान एकतरी गूगल सेवा वापरतोच. यामुळे गूगलकडे आपली वैयक्तिक माहिती असणे साहजिक आहे मात्र गूगल या माहितीचा वापर कशा प्रकारे करतं आणि आपण ते नियंत्रित करू शकतो हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही. म्हणूनच याबद्दल वापरकर्त्यांना अधिक माहिती मिळावी म्हणून गूगलने त्यांच्या Google Safety Center या सेवेला भारतात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तोसुद्धा ९ भारतीय भाषांमध्ये! मराठी, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, कन्नड, मल्याळम, तामिळ व उर्दू या भाषांमध्ये ही सोय वापरता येणार आहे.

गूगल सेफ्टी सेंटर लिंक : https://safety.google

गूगल सेफ्टी सेंटरमध्ये गूगलच्या सर्व सेवांची माहिती एकाच ठिकाणी दिसेल आणि त्यावर संबंधित नियंत्रणासाठी टूल्स दिलेली दिसतील ज्याद्वारे काही गोष्टीसाठी गूगलने आपला डेटा वापरावा कि नको हे आपण ठरवू शकतो. यामुळे आपल्या डेटाची गोपनीयता जपण्यास मदत होईल आणि आपलं अकाउंट अधिक सुरक्षित करता येईल!      

search terms : google safety center in India with Marathi support along with 9 Indian languages

Exit mobile version