क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर सादर : आता फोन्समध्ये लवकरच 5G तंत्रज्ञान!

क्वालकॉमचा नवा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सादर झाला असून २०१९ मधील सर्व मोठ्या फोन्समध्ये हा प्रोसेसर पाहायला मिळेल! SD845 नंतर आता हा SD855 5G तंत्रज्ञानासह सज्ज असून हा फ्लॅगशिप प्रोसेसर २०१९ मधील फोन्स 5G इंटरनेटवर घेऊन जाईल. हवाई येथे सुरु असलेल्या स्नॅपड्रॅगन टेक्नॉलॉजी समिट मध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.     

हा प्रोसेसरचा चिपसेट आता 5G इंटरनेट तंत्रज्ञानाची लाट आणायला सुरुवात करेल. २०१९ मध्ये आपण सादर होणार्‍या फोन्समध्ये 5G सुरु झाल्याचं पाहू शकू. क्वालकॉमचे प्रोसेसर्स आता जवळपास सर्वच प्रमुख अँड्रॉइड फोन्समध्ये बसवलेले असतात. काही प्रमाणात थोड्या मॉडेल्सवर मीडियाटेकचे प्रोसेसर्स असतात. 5G तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन क्वालकॉमने इतरांच्या मानाने आधीच आघाडी घेतली आहे. हा नवा प्लॅटफॉर्म मल्टी गिगाबिट डाउनलोड स्पीड देऊ शकेल असं सांगण्यात आलं आहे!

या नव्या प्रोसेसरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून हे प्रोसेसर आधीच्या प्रोसेसर्सच्या मानाने तिप्पट अधिक चांगली कामगिरी करू शकतील! आपण फोटो काढत असलेली वस्तू काय आहे हे सांगण्यापर्यंत याची बुद्धिमत्ता काम करेल! चिपमध्ये गेमिंग व ऑगमेंटेड रियालिटी अनुभव सुद्धा सुधारण्यात आला आहे! नवा प्रोसेसर 7nm पद्धतीने बनवला जाईल! सोबतच क्वालकॉमने त्यांच्या डिस्प्लेखाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्याच्या सोयीचं नाव अल्ट्रासॉनिक हे बदलून 3D सॉनिक सेन्सर असं केलं आहे!

search terms Qualcomm snapdragon 855 with 5G technology launched information in marathi

Exit mobile version