अॅमेझॉन अलेक्सावर आता ३५० रेडियो स्टेशन्स ऐकण्याची सोय!

अॅमेझॉनच्या अलेक्सा या व्हॉईस असिस्टंटमध्ये आता ३५० भारतीय रेडियो स्टेशन्स ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबत प्राइम म्युझिक, गाना, सावन आणि हंगामा म्युझिक या स्ट्रिमिंग सेवांवरून गाणी स्ट्रिम करण्याचीही सुविधा उपलब्ध झाली आहे. ही घोषणा जागतिक रेडियो दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली जो जगभर १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो!

अॅमेझॉनच्या अलेक्सा यूजर्सना १४ भाषांमध्ये १७ ऑल इंडिया रेडियो (AIR) स्टेशन्स ऐकता येतील ज्याला देशभरातील खासगी वाहिन्यांचीही जोड देण्यात आली आहे. विविध भारती, एफएम गोल्ड, आकाशवाणी सोबत रेडियो सिटी, रेडियो वन हे सुद्धा उपलब्ध असणार आहेत! अलेक्सा स्किल्स वापरुन प्रकारानुसार गाणी ऐकता येतील. लाईव्ह रेडियो स्टेशन्सचाही यामध्ये समावेश आहे.

काही नव्या वाहिन्या जोडण्यासाठी All India Radio, Radio City व Radio One हे स्किल्स अलेक्सा अॅपमध्ये जोडलेले असावे लागतील. एकदा तुम्ही वरील स्किल्स अलेक्सासोबत जोडले की त्यानंतर “Alexa, play” किंवा “Alexa, open” हे बोलून पुढे तुम्हाला हव्या असलेल्या स्टेशनचं नाव सांगायचं आहे. उदा. “Alexa, open All India Radio Marathi”

अलेक्सा आधारित काही उपकरणे

TuneIn व myTuner स्किल्स जोडताच तुम्हाला जागतिक रेडियो स्टेशन्स जसे की BBC Radio, ESPN Radio सुद्धा ऐकता येतील. या रेडियो स्टेशन्सची जोड दिल्यामुळे भारतात अॅमेझॉन अलेक्सा गूगल असिस्टंटच्या एक पाऊल पुढे नक्कीच गेलं आहे….!

Serach Terms : Amazon Alexa now offers 350 radio stations with Alexa Assistant

Exit mobile version