ओप्पो रेनो स्मार्टफोन सादर : 10x झूम असलेला कॅमेरा!

MWC 2019 मध्ये हायब्रिड झुम तंत्रज्ञान प्रदर्शित केल्यानंतर ओप्पोने त्यांचा नवा स्मार्टफोन ‘रेनो’ (Reno) सादर केला आहे. यामध्ये 10x झूम व Qualcomm Snapdragon 855 प्रोसेसरचा समावेश असेल.

हा फोन आज चीनमध्ये सादर झाला असून स्टँडर्ड एडिशन 6GB+128GB ची किंमत 2999 युवान (~₹ ३१,०००) अशी असेल. चार रंगात हा फोन उपलब्ध होईल. यासोबत Oppo Reno 10x Zoom Edition सुद्धा सादर करण्यात आली असून याची 6GB+128GB किंमत 3999 युवान (~₹ ४१,०००) अशी असेल. ही एडिशन/आवृत्ती दोन रंगातच उपलब्ध होईल. दोन्ही फोन्सच्या 6GB+256GB व 8GB+256GB मध्येही आवृत्त्या उपलब्ध होतील. २४ एप्रिलला हा फोन जागतिक स्तरावर सादर होईल आणि भारतीय किंमतीही तेव्हाच जाहीर करण्यात येतील. याच्या 5G आवृत्तीबद्दलही तेव्हाच अधिक माहिती जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे.

Oppo Reno 10x Zoom Edition Specs :
डिस्प्ले : 6.6-inch Full-HD+ AMOLED
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB/256GB
कॅमेरा : 48MP (f/1.7) Sony IMX586 sensor +8MP (f/2.2) ultra wide-angle sensor + 13MP (f/3.0) telephoto 16-160mm full focal length
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 4065mAh VOOC 3.0 fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6 based on Android 9 Pie
रंग : fog sea green, extreme night black
इतर : 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, dual GPS, NFC, USB Type-C
किंमत : भारतीय किंमत अद्याप जाहीर नाही
6GB+128GB किंमत 3999 युवान (~₹ ४१,०००)


Exit mobile version