व्हॉट्सअॅपवर वारंवार फॉरवर्ड केले जाणारे मेसेज ब्लॉक करता येणार!

व्हॉट्सअॅपमुळे खोट्या बातम्या (फेक न्यूज) पसरणे, चुकीच्या माहितीचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रसार यामुळे अलीकडच्या काळात झालेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप नवनवे प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच कोणत्या ग्रुपमध्ये अॅड व्हायचं याचा जॉइन होण्यापूर्वीचं निर्णय घेता येण्याची सोय देण्यात आली असून आता या नव्या सोयीमुळे ग्रुप्समध्ये वारंवार फॉरवर्ड करण्यात आलेले संदेश (frequently forwarded) ब्लॉक करता येतील!

Source : WABetaInfo

ह्या सोयीची सध्या चाचणी सुरू असू लवकरच सर्वांसाठी उपलब्ध झालेली पाहायला मिळेल. या सोयीमुळे ग्रुप अॅडमिननाच दिसणार्‍या प्रायव्हसी सेटिंग्सद्वारे अशा संदेशना ब्लॉक करून शकतील ज्यावर frequently forwarded असं लेबल लावलेल असेल जे व्हॉट्सअॅप स्वतःच लावणार आहे!

अशामुळे काही प्रमाणात चुकीची माहिती पसरण्यास आळा घालता येणार असला तरी पुर्णपणे शक्य होणार नाही. कारण ह्या सिस्टिममध्ये कॉपी पेस्ट केलेल्या मेसेजेसना ग्राह्य धरलं जात नाही. पाठवणारा व्यक्तीला जर हे माहीत असेल तर तो नक्की फॉरवर्ड बटन ऐवजी कॉपी पेस्ट करूनच पाठवेल… सध्या व्हॉट्सअॅप ५ चॅट्समध्येच फॉरवर्डद्वारे संदेश पाठवण्याची परवानगी देतं. मात्र कॉपी पेस्ट द्वारे अनेकांना पाठवता येतो!

4 पेक्षा अधिक वेळा फॉरवर्ड झालेल्या मेसेजसमोर आता frequently forwarded असं लेबल दिसेल! हे सेटिंग व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी आलेल्या ग्रुपसंबंधित प्रायव्हसी (गोपनीयता) पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्यावर येणार आहेत. यामुळे कोणत्याही व्यक्तिला त्याच्या इच्छेशिवाय ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही. त्याने होकार दिल्यावरच ग्रुपमध्ये जोडला जाईल!

Search Terms : Whatsapp now blocking frequently forwarded messages in groups

Exit mobile version