आता एसुसचा दोन डिस्प्ले असलेला लॅपटॉप : ZenBook Pro Duo सादर!

गेली काही वर्षं लॅपटॉप्सबाबतीत फार काही नवीन पाहायला मिळालं नव्हतं मात्र आता अधिक मोठे डिस्प्ले, कमी बेझल्स, उत्तम स्पीकर्स, चांगली गेमिंग क्षमता, टचस्क्रिन अशा सुधारणा करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी आलेला एचपीचा Omen X 2S लॅपटॉप हा दोन डिस्प्ले असलेला पहिलाच लॅपटॉप ठरला होता. आता तीच कल्पना आणखी पुढे नेत एसुसने Computex मध्ये झेनबुक प्रो ड्युओ सादर केला आहे. यामध्ये मुख्य डिस्प्लेसोबत आणखी एक १५ इंची 4K डिस्प्ले देण्यात आला आहे! यामध्ये दुसरा डिस्प्ले टचस्क्रिन असून यावर पेन इनपुट सुद्धा उपलब्ध आहे

अपडेट १८-१०-२०१९ : आज हा लॅपटॉप भारतात सादर झाला असून Asus ZenBook Duo ची किंमत ८९९९० तर ZenBook Pro Duo ची किंमत २,०९,९९० इतकी असेल.

या लॅपटॉपच्या दुसर्‍या डिस्प्लेला एसुसने स्क्रिनपॅड प्लस नाव दिलेलं आहे. यावर फोटो एडिटिंग, प्रोग्रामिंग, म्युझिक एडिटिंग, गेमिंग सर्व काही सहजसोपं होईल! यावर याचा टचपॅडसुद्धा यापूर्वी आलेल्या स्क्रिनपॅडची नवी आवृत्ती आहे.

Asus Zenbook Pro Duo Specs
प्रोसेसर : Intel Core i9-9980HK, 8C/16T, 2.4GHz (16MB cache, up to 5GHz)
ऑपरेटिंग सिस्टिम : Windows 10 Home / Pro
डिस्प्ले : 15.6” NanoEdge OLED + 14″ ScreenPad Plus touchscreen
Main: 4K (3840 x 2160) ScreenPad Plus: 4K UHD
GPU : NVIDIA GeForce RTX 2060 with 6GB GDDR6 VRAM
रॅम : 32GB DDR4 @ 2666MHz,
स्टोरेज : 1TB PCIe x4 SSD 512GB / 256GB PCIe x2 SSD
पोर्ट्स : 1 x Thunderbolt 3 USB-C, 2 x USB 3.1 Gen 2 Type-A, 1 x Standard HDMI, 1 x Audio combo jack, 1 x DC-in
किंमत :

Exit mobile version