MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

एचपीचा दोन स्क्रिन्स असलेला गेमिंग लॅपटॉप Omen X 2S

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 15, 2019
in गेमिंग, लॅपटॉप्स

एचपीने काल एक ड्युअल स्क्रीन लॅपटॉप सादर केला असून यामध्ये मुख्य डिस्प्लेसोबत लॅपटॉपच्या किबोर्डवरही एक छोटा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा दुसरा डिस्प्ले ६ इंची 1080p रेजोल्यूशन असलेला आहे. या डिस्प्लेला मुख्य डिस्प्लेवरील दृश्य मिरर करून छोट्या डिस्प्लेवर दाखवण्याची भन्नाट सोय देण्यात आली आहे! उदाहरणार्थ तुम्ही एखादी गेम खेळत असाल आणि त्या गेममध्ये कोपर्‍यात दिसणारा मॅप तुम्ही सिलेक्ट केला तर तो मॅप त्या दुसर्‍या स्क्रिनवर दिसेल जेणेकरून गेम खेळताना तो मॅप तुम्ही मोठ्या रूपात व सहज पाहू शकाल!

त्या स्क्रिनवर गेम खेळताना यूट्यूब, ट्विचवरील व्हिडिओ लावू शकता. गेम्समधील मॅप्सवर झुम करू शकता. डिस्कॉर्डवरील चॅट पाहू शकता यापैकी काही नको तर लॅपटॉपच्या CPU व GPU परफॉर्मन्सबद्दल सर्व माहिती दर्शवली जाईल! हा दुसरा डिस्प्ले टचस्क्रिन असल्यामुळे वापरण्यास आणखी सोपा असेल. असे दोन स्क्रीन असलेले लॅपटॉप यापूर्वीसुद्धा आले आहेत मात्र मुख्य स्क्रिन त्याच लॅपटॉपच्या दुसर्‍या डिस्प्लेवर मिरर करण्याची सोय प्रथमच देण्यात आली आहे! यापूर्वी आलेला एसुसचा लॅपटॉप ज्यामध्ये टचपॅड ऐवजी टचस्क्रिन डिस्प्ले देण्यात आला होता जो टचपॅड म्हणून वापरता येतो! याचा डेमो https://youtu.be/lvNKG5mc_iQ?t=226 इथे पाहू शकाल.

ADVERTISEMENT

या लॅपटॉपचा मुख्य डिस्प्ले १५ इंची 1080p रेजोल्यूशन असलेला असून याचा रिफ्रेश रेट 144Hz असेल ज्याला 240Hz/4K HDR चाही पर्याय उपलब्ध आहे! या गेमिंग लॅपटॉपमध्ये इंटेलचे नवीन 9th Gen Core i9 Octa Core प्रोसेसर असून 32GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे! ग्राफिक्स कार्डसुद्धा नवं Nvidia GeForce RTX 2080 Max Q आहे! Omen X 2S साठी खास कुलिंग सिस्टम बसवण्यात आलेली आहे ज्यामध्ये लिक्विड मेटल कंपाऊंड आहे जे थेट सीपीयूला जोडलेल असेल ज्यामुळे लॅपटॉपचं तापमान नियंत्रित राहील!
HP Omen X 2S

हा 22mm जाडीचा गेमिंग लॅपटॉप असून हा जून महिन्यात बाजारात उपलब्ध होईल व याची किंमत 2099.99 डॉलर्स (~ ₹१,५०,०००) पासून सुरू होईल! हा लॅपटॉप भारतात उपलब्ध होण्यास आणखी कालावधी लागू शकतो.

Source: OMEN X 2S 15 Laptop World's first dual-screen Gaming Laptop!
Tags: DisplayGamingHPLaptops
Share7TweetSend
Previous Post

वनप्लस 7 Pro सादर : भन्नाट स्मार्टफोन!

Next Post

DJI Osmo Action कॅमेरा सादर : गोप्रोला नवा पर्याय?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Next Post
DJI Osmo Action कॅमेरा सादर : गोप्रोला नवा पर्याय?

DJI Osmo Action कॅमेरा सादर : गोप्रोला नवा पर्याय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech