विंडोज १० मे २०१९ अपडेट उपलब्ध : लाईट थीमचा समावेश

मायक्रोसॉफ्टने आजपासून त्यांच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमचं नवं अपडेट Windows 10 May 2019 उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. या अपडेटमध्ये प्रामुख्याने सांगता येईल अशी नवी गोष्ट म्हणजे लाईट थीम. सोबत Kaomoji या जपानी इमोटीकॉन्स (उदा. ( ͡° ͜ʖ ͡°) साठी सपोर्ट, विंडोज सॅंडबॉक्स सुविधा, कोर्टाना व विंडोज सर्चचं विभाजन, इ बदल पाहायला मिळतील.

या सर्वांसोबत मायक्रोसॉफ्टने विंडोज रिलीज हेल्थ डॅशबोर्ड आणला असून आपण ज्यावेळी नव्या अपडेटद्वारे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करतो त्यावेळी त्यामध्ये कोणत्या अडचणी येत आहेत हे या ठिकाणी दर्शवलं जाईल. गेल्यावेळच्या ऑक्टोबर अपडेट दरम्यान उडालेल्या गोंधळामुळे मायक्रोसॉफ्ट आता खास काळजी घेताना दिसत आहे. मे २०१९ अपडेट सुद्धा एकाच वेळी सर्वांना उपलब्ध करून न देता टप्प्याटप्प्यात उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येत आहे. नव्या अपडेटचा व्हर्जन नंबर Windows 10 1903 असा आहे.

हे मे २०१९ अपडेट मिळवण्यासाठी Settings > Update & Security > Windows Update नंतर Checking for updates अशा क्रमाने जा विंडोज अपडेट सुरू होईल. यासाठी काही कालावधी लागू शकतो. अपडेट करण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून महत्वाच्या फाइल्सचा बॅकअप घ्यायला विसरू नका.

विंडोज १० इंस्टॉल करण्याबाबत माहितीसाठी आमचा व्हिडिओ पाहू शकता : How Install Windows 10 on PC/Laptop – Guide in Marathi https://youtu.be/cYjixgDtTiU

Exit mobile version