विंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध !


मायक्रोसॉफ्टने आज त्यांच्या मायक्रोसॉफ्ट सर्फेस इव्हेंटमध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिमचं नवं अपडेट उपलब्ध करून देत असल्याचं जाहीर केलं असून याचं नाव ऑक्टोबर अपडेट असं असेल. यापूर्वीच्या एप्रिल अपडेटमध्ये काही सुधारणा करून हे नवं अपडेट विंडोज वापरकर्त्यांना डाउनलोडसाठी उपलब्ध झालं आहे.
हे अपडेट आपोआप विंडोज अपडेटद्वारे ९ तारखेला मिळणार असून जर आता लगेच हवं असेल तर ISO डाउनलोड करून manually इंस्टॉल करू शकता किंवा विंडोज अपडेट असिस्टंट द्वारे सुद्धा Check Updates पर्याय वापरुन डाऊनलोड करू शकता.
विंडोज १० इंस्टॉल मराठीमध्ये : Windows 10 Install Guide in Marathi     
या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करून तुम्ही हे नवं अपडेट सुद्धा इंस्टॉल करू शकाल. आता या नव्या अपडेटमध्ये असलेल्या नव्या सोईंची ओळख करून घेऊया ...


Your Phone App : आता मेसेज पाठवण्यासाठी फोन हातात घेण्याची गरज नाही. फोटो कॉम्पुटर मध्ये घेण्यासाठी ई-मेल करत बसण्याची गरज नाही. या अॅपद्वारे अँड्रॉइड फोनमधील डेटा कॉम्पुटरवर सहज अफ़ाट आणि वापरता येईल! फोनमधील फोटो ड्रॅग व ड्रॉप करण्याची भन्नाट सोया यामध्ये आहे! सोबत याच अॅपमधून आपण SMS सुद्धा पाठवू/वाचू शकू!

Timeline on phone : यामुळे आपण कॉम्पुटर वापरत असताना केलेल्या सर्व गोष्टींची यादी आपल्या फोनवर सहज पाहू शकू! ही सोया विंडोजवर एप्रिल अपडेटमध्ये आली होती. ज्यामुळे आपण कॉम्पुटर वापरात असताना भेट दिलेल्या वेबसाईट्स, सॉफ्टवेअर पाहता येऊ शकतात. https://youtu.be/D_5XjZLDFlg
Inking and 3D in PowerPoint and Word : इंकिंग सेवेद्वारे आपण मजकूर हायलाईट करू शकतो. हाताने लिहलेला मजकूर आपोआप ओळखून टाइप केला जाईल! (टच यूजर्ससाठीच). पॉवरपॉईंटमध्ये सुद्धा 3D मॉडेल्सचा वापर करता येणार असून प्रेझेंटेशन दरम्यान यांचं 3D अॅनिमेशनसुद्धा दाखवता येईल!
Intelligent inking and 3D updates in PowerPoint and Word

Microsoft To-Do : दैनंदिन कामांची यादी बनवण्यासाठी नवं सोपं विंडोज अॅप जे अँड्रॉइड, iOS व विंडोज सगळीकडे आपोआप Sync केलं जाईल!

Snip and Sketch Tool : आधीच्या स्निपिंग टूल सोबत आता हे नवं अॅप स्वरुपात उपलब्ध होणारं स्निप अँड स्केच टूल अधिक सोयीसह उपलब्ध होत आहे. तूर्तास जुनं टूल सुद्धा तसंच ठेवण्यात येत आहे.

डार्क विंडोज एक्सप्लोरर : विंडोज एक्सप्लोरर सुद्धा आता प्रथमच डार्क थीममध्ये उपलब्ध होत आहे. 

Microsoft Edge General Improvements : एज ब्राऊजर मध्ये बरेच नवे बदल आणि आणखी सोईंची जोड देण्यात आली आहे. लर्निंग टुल्स, ग्रामर टूल्स, लाइन फोकस, ऑफलाइन डिक्शनरी अशा या सोयी आहेत.     

इतर बदल : 
SwiftKey intelligence comes to Windows : स्विफ्टकीमधील ऑटोकरेक्ट सारख्या सुविधा विंडोजच्या टच आधारित कीबोर्डवर उपलब्ध होत आहेत!    
Emoji 11 : नव्या इमोजींचा समावेश 
Start tile folder naming
Search Improvements : विंडोज सर्चमध्ये अनेक सुधारणा, डिझाईन बदल 
PC Gaming Improvements : गेम बार मध्ये अनेक सुधारणा, नवा लूक 
Microsoft Font Maker app  :तुमच्या आवडीचा फॉन्ट स्वतः बनवणं शक्य ! लिंक 

इतर बदलांबद्दल अधिक माहितीसाठी लिंक : Find out what’s new in Windows and Office in October

Update : मायक्रोसॉफ्टने काल हे अपडेट परत घेतलं असून काही यूजर्सच्या विंडोज १० ऑक्टोबर केल्यावर फाइल्स डिलिट होत असल्याच निदर्शनास आलं आहे. लवकरच यामध्ये दुरूस्ती करून पुन्हा नव्याने उपलब्ध करून देण्यात येईल. असं सांगण्यात आलं आहे.
search terms Windows 10 OCtober Update Download ISO Link Whats New 
विंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध ! विंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध ! Reviewed by Sooraj Bagal on October 03, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.