अडोबीचा नवीन AI ओळखेल फॉटोशॉप केलेले खरे/खोटे फोटो!

अडोबीने अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात समस्या बनत असलेल्या फेक न्यूज, एडिटेड व्हायरल फोटोजवर उपाय शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे. फोटो एडिटिंगसाठी जगात सर्वात लोकप्रिय असलेल्या फॉटोशॉप या सॉफ्टवेअरद्वारे आता गैरप्रकार करण्यासाठीही वापर केला जात असल्याच निदर्शनास आलं आहे. यावर उपाय म्हणून अडोबीने कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेत एखादा फोटो खरा आहे की नाही किंवा तो एडिटेड आहे का हे सांगता येणारी सोय तयार केली आहे.

अडोबीचे रिसर्चर्स रिचर्ड झांग व ऑलिव्हर वांग यांनी UC Berkeley च्या शेंग यू वांग व डॉ. अँड्र्यु ओवेन्स यांच्या सहकार्याने चेहर्‍यांसोबत केल्या गेलेल्या फॉटोशॉप फॉटोशॉप ओळखता येईल असा AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तयार केली आहे! यासाठी अडोबीच्या Face Aware Liquify सुविधेचा वापर करण्यात आला असून ही सुविधा फोटोशॉपमध्ये चेहर्‍यावर बदल करण्यासाठी वापरले जाते. एक न्यूरल नेटवर्क अशा पद्धतीने तयार केलं गेलं की ते हजारो फोटो वापरुन एखाद्या फोटोमधील चेहर्‍यावर केलेला बदल ओळखेल!

यासाठी अडोबीनी एक चाचणी सुद्धा घेतली ज्यामध्ये हे मूळ फोटो व एडिटेड फोटो काही व्यक्तींसोबत AI ला दाखवण्यात आले. त्या व्यक्तींनी ५३% फोटोमध्ये बदल केलेला असल्याच ओळखलं तर AI ने तब्बल ९९% फोटोमध्ये केलेला बदल ओळखला! हा AI इतक्या चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला आहे की या फेक फोटोमध्ये करण्यात आलेले बदल रिव्हर्स करून मूळ फोटो कशा प्रकारे दिसत असेल हे सुद्धा दाखवतो!

अडोबीला भविष्यात AI ची मदत घेऊन अशा प्रकारे फोटोंची सत्यता तपासण्याची टूल्स निर्माण करण्याची आशा आहे. फॉटोशॉपसारख्या एका सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअरचा गैरवापर झालेलं नक्कीच त्यांना नाही आवडणार… अशा उत्तम सुविधांचा चांगल्या ऐवजी वाईट गोष्टींसाठीच जास्त चर्चा होऊ लागल्यामुळे अशी पावले भविष्यात सर्वच प्रकारच्या तंत्रज्ञानाबद्दल उचलावी लागतील!

Search Terms : Adobe Research and UC Berkeley: Detecting Facial Manipulations in Adobe Photoshop

Exit mobile version