एयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स!

एयरटेल टीव्ही अॅपमधील सेवा आता डेस्कटॉप वेबसाइटवरही पाहता येतील!

गेले काही महीने अनेक टेलीकॉम ऑपरेटर्सची वाढलेली स्पर्धा त्यांना आता कॉल व डेटा पॅक्ससोबत आणखी काही गोष्टी देण्यास भाग पाडत असल्याच चित्र दिसून येत आहे. पोस्टपेड ग्राहकांना याचा अधिक चांगला अनुभव येत आहे. कॉल्स व डेटा पॅक सोबत आता नेटफ्लिक्स किंवा प्राइमचं सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे तर काही जण टीव्ही अॅप्सद्वारे चित्रपट, मालिका, लाईव्ह टीव्ही उपलब्ध करून देत आहेत. आता एयरटेलने त्यांच्या फोन अॅप्समधील कंटेट डेस्कटॉप वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. काही महिन्यांपूर्वी जिओने सुद्धा ही सेवा सुरू केली आहे.

एयरटेल टीव्ही डेस्कटॉप वेबसाइट : https://www.airtelxstream.in
जिओ सिनेमा डेस्कटॉप वेबसाइट : https://www.jiocinema.com

Airtel TV द्वारे एयरटेल सध्या जवळपास ११५ लाईव्ह टीव्ही चॅनल्स वेबसाइटवर दाखवत आहे. ही सेवा ज्यांनी फोनवर एयरटेलच्या पॅकद्वारे रीचार्ज केला आहे त्या सर्वाना मोफत उपलब्ध असणार आहे. यासाठी वर दिलेल्या वेबसाइटवर जाऊन तुमच्या फोन क्रमांक टाकला की एक otp येईल तो टाकायचा की लगेच तुम्ही एयरटेल टीव्हीवरील चित्रपट, मालिका, लाईव्ह टीव्ही फोनसोबत डेस्कटॉप वेबसाइटद्वारे पीसी, लॅपटॉपवरही पाहू शकाल!

एयरटेल टीव्ही फोनवरसुद्धा बरंच लोकप्रिय असून त्यांच्या अॅपवर सर्व प्रमुख भारतीय भाषांमधील वाहिन्या, चित्रपट उपलब्ध आहेत. ZEE5, Hungama, Eros Now, HOOQ, Alt Balaji, ShareIt, YouTube यांच्यासोबत भागीदारी करून त्यामधील कंटेटसुद्धा एयरटेल टीव्हीवर मोफत पाहता येतो!

एयरटेलच्या पोस्टपेड प्लॅन्ससोबत ग्राहकाना अॅमेझॉन प्राइमची एक वर्षाच आणि नेटफ्लिक्सच तीन महिन्यांच सबस्क्रिप्शन मोफत मिळतं! सोबत एयरटेल टीव्ही आहेच! एयरटेलच्या पोस्टपेडमध्ये शिल्लक डेटा रोलओव्हर करून पुढील महिन्यात जोडला जातो!

Airtel TV Android App on Google Play Store

Airtel TV iOS App on Apple App Store

Exit mobile version