भारतात आता 5G सेवा उपलब्ध होऊन बरेच दिवस झाले आहेत. टप्प्याटप्प्यात अधिकाधिक शहरांमध्ये 5G सेवा जोडण्यात येत आहे. रिलायन्स जियो आणि आता एयरटेलनेसुद्धा त्यांच्या ग्राहकांना 5G सेवेत सहभागी होण्यासाठी खास Welcome Offer आणल्या असून यामध्ये मोफत अमर्यादित 5G इंटरनेट डेटा वापरता येईल! या डेटाचा स्पीडसुद्धा 1Gbps पर्यंत असेल!
खालील ऑफर जियो आणि एयरटेलच्या प्रिपेड व पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना उपलब्ध आहे.
जियो ग्राहकांसाठी : तुम्हाला तुमचा फोन 5G आहे का हे पहावं लागेल त्यानंतर फोनमध्ये MyJio हे ॲप घेऊन त्यामध्ये 5G च्या बॅनरवर जाऊन तुमच्या नंबरला Welcome Offer उपलब्ध आहे का ते पहा. यासाठी तुम्हाला ₹239 किंवा त्यापेक्षा अधिकचा कोणत्याही प्लॅनने रिचार्ज केलेला असावा. हा तुमचा नेहमीचा 4G प्लॅन असला तरी त्यामध्येच फ्री 5G डेटा मिळणार आहे!
जियोचा एक स्वतंत्र 5G Upgrade Plan सुद्धा असून 61 रुपयांचा रिचार्ज वर 6GB 4G डेटा मिळेल आणि Unlimited 5G डेटा मिळेल. हा प्लॅन वापरण्यासाठी आधी 119, 149, 179, 199, 209 यापैकी कोणतातरी एक प्लॅन ॲक्टिवेट केलेला असावा. २३९ पेक्षा कमी किंमतीच्या प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा ६१ रुपयांचा प्लॅन आहे.
एयरटेल ग्राहकांसाठी : तुम्हाला तुमचा फोन 5G आहे का हे पहावं लागेल त्यानंतर फोनमध्ये Airtel Thanks हे ॲप घेऊन त्यामध्ये Claim Unlimited 5G Data असा बॅनर दिसेल त्यावर जाऊन तुमच्या फोनच्या सेटिंग्स व ऑफर पहा. यासाठी तुम्हाला ₹239 किंवा त्यापेक्षा अधिकचा कोणत्याही प्लॅनने रिचार्ज केलेला असावा. हा तुमचा नेहमीचा 4G प्लॅन असला तरी त्यामध्येच फ्री 5G डेटा मिळणार आहे!
तुम्ही 5G नेटवर्क रेंजमध्ये नसल्यास तुमचा प्लॅनमधील 4G डेटा वापरला जाईल हे मात्र लक्षात ठेवा.
ही ऑफर Welcome Offer नावाने आणली असून काही महिन्यांनी नक्कीच स्वतंत्र 5G प्लॅन्स उपलब्ध होतील आणि त्यानुसार वेगळा रिचार्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी Airtel Thanks आणि MyJio या ॲप्सचा वापर करा.