Amazfit Bip Lite स्मार्टवॉच आता भारतात उपलब्ध!

Amazfit Bip Lite

Huami Amazfit Bip Lite हे तब्बल ४५ दिवसांची बॅटरी लाईफ असलेलं स्मार्टवॉच कालपासून भारतात उपलब्ध झालं असून हे शायोमीचे फिटनेस बॅंड्स, स्मार्टवॉच बनवणाऱ्या हुयामी यांनी त्यांच्या अमेझफिट ब्रॅंड अंतर्गत सादर केलं आहे.

या स्मार्टवॉचमध्ये Optical PPG heart rate sensor असून याद्वारे आपण सायकलिंग, रनिंगसारख्या गोष्टी ट्रॅक करू शकतो. याआधी आलेल्या Amazfit Bip प्रमाणेच Bip Lite सुद्धा Android व iOS सपोर्ट करतं. यामध्ये आपल्या फोनमध्ये येणाऱ्या नोटिफिकेशन्स रियल टाइम पाहता येतात. हे स्मार्टवॉच अॅमॅझॉनवर उपलब्ध आहे.

Amazfit Bip Lite मधील सुविधा खालीलप्रमाणे :
• 1.28-inch always-on display
• activity tracking on-the-go
• four cardio activities, including cycling आणि running
• optical PPG सेन्सर heart rate monitoring साठी
• three-axis accelerometer, barometer आणि compass
• 30 meters water-resistant, swim proof

Amazon.in वर हे अमेझफिट बिप लाइट स्मार्टवॉच १५ जुलै पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल आणि याची किंमत ३९९९ इतकी असणार आहे. स्वस्त स्मार्टवॉच आणि सोबत ४५ दिवस टाकणारी बॅटरी यामुळे हे घडयाळ नक्कीच एक चांगला पर्याय ठरणार आहे.

Buy Amazfit Bip Lite on Amazon : https://amzn.to/2Xvz6BM

हे घडयाळ अॅमॅझॉन प्राइम डेच्या निमित्ताने भारतात उपलब्ध होईल. प्राइम डे निमित्त अॅमॅझॉनवर अनेक ऑफर्स पहायला मिळणार आहेत!

Exit mobile version