Redmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय!

रेडमी 7A काल भारतात सादर झाला असून हा फोन ११ जुलैपासून सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. Redmi A मालिकेमध्ये (4A, 5A, 6A) तब्बल २.३६ कोटी फोन्स विकून भरघोस यश मिळवल्यानंतर आता याच मालिकेतला नवा फोन उपलब्ध झाला आहे! 7A मध्ये Snapdragon 439 प्रोसेसर HD+ डिस्प्ले, 32GB स्टोरेज, 4000mAh बॅटरी, वायरलेस एफएम रेडियो, SD Card Slot अशा सुविधा अवघ्या ५७९९ रुपयात मिळणार आहेत! सोबत दोन वर्षं वॉरंटीसुद्धा!

Redmi 7A Specs

डिस्प्ले : 5.45″ HD+ Full Screen Display 18:9 aspect ratio
रेजोल्यूशन : 1440 x 720, 295 PPI
प्रोसेसर : Qualcomm®Snapdragon™ 439
रॅम : 2GB
स्टोरेज : 16GB/32GB + Expandable upto 256GB
कॅमेरा : 12MP AI Sony IMX486 sensor f/2.2
फ्रंट कॅमेरा : 5MP
बॅटरी : 4000mAh Supports 10W charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
सेन्सर्स : ·Vibration motor, Proximity sensor, Ambient light sensor, Electronic compass, Accelerometer
रंग : Matte black, Matte blue, Matte gold
किंमत : भारतात ११ जुलै पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध
₹५९९९ (पहिल्या सेलवेळी ५७९९)

या फोनला पर्याय हवा असल्यास RealMe C2, Samsung Galaxy M10, Nokia 2.2 हे उत्तम पर्याय ठरू शकतात. मात्र सुविधांचा विचार करता रियलमीचाच फोन उजवा ठरतोय!

Exit mobile version