MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

श्री विठ्ठल लाईव्ह दर्शन आता जिओटीव्हीवर उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 12, 2019
in News
JioTV Vitthal Darshan Pandharpur

आज म्हणजे १२ जुलैपासून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुखमाई मंदिराचं जगभरातून कोणत्याही जागेवरून लाईव्ह दर्शन घेता येणार आहे! जिओ टीव्ही ही सेवा रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध असून याद्वारे चित्रपट, मालिका, टीव्ही चॅनल्स लाईव्ह पाहता येतात. या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत कोणत्याही वेळी भाविकांना विठ्ठलाचं लाईव्ह दर्शन त्यांच्या फोन्सद्वारे सहज घेता येईल!

जिओ टीव्हीद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन लाईव्ह कसे पाहायचे ?

  1. प्रथम तुमच्या फोनमध्ये जिओचं सिमकार्ड असायला हवं
  2. त्यानंतर फोनमध्ये प्ले स्टोअरवरून Jio TV अॅप डाउनलोड करून घ्या
    लिंक : JioTV on Google Play
  3. आता तुम्हाला मधल्या भागात उजवीकडे Categories व Languages असे दोन पर्याय दिसतील
  4. त्यामध्ये Categories अंतर्गत Devotional निवडा आणि Languages अंतर्गत मराठी निवडा
  5. आता यामध्ये तिसरा पर्याय श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन असा दिसेल त्यावर टॅप करा
  6. आता तुमच्यासाठी विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन सुरू झालेलं दिसेल..!

यासंबंधीची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी जाहीर केली आहे. आषाढीसह इतर दिवशीसुद्धा ही लाईव्ह स्ट्रिम सुरूच राहणार असल्यामुळे कायम ऑनलाइन दर्शन उपलब्ध असणार आहे.

ADVERTISEMENT

जिओ टीव्ही व टाटा स्काय यांच्यासोबत झालेल्या करारामुळे मंदिर समितीला येत्या तीन वर्षात १.२५ कोटींचं उत्पन्न मिळणार आहे. भाविकांना घरबसल्या हे दर्शन आधी टाटा स्कायद्वारे टीव्हीवर २४ तास स्वतंत्र भक्ती वाहिनीद्वारे आणि आता जिओ टीव्हीद्वारे फोन्सवर सुद्धा कधीही उपलब्ध झालेलं आहे!

JioTV Download Links : https://jiotv.com

Search Terms : shri vitthal rukmini darshan pandharpur live

खास आषाढी एकादशीनिमित्त आम्ही ही पोस्ट केली असून खाली दिलेल्या शेयर बटनांचा वापर करून हा लेख शेयर करायला विसरू नका.

Tags: JioJio TVPandharpurVitthalWari
Share13TweetSend
Previous Post

Nintendo Switch Lite सादर : पोर्टेबल गेमिंगला नवा स्वस्त पर्याय!

Next Post

Sigma fp : जगातला सर्वात लहान फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Jio Airtel New Plans

जिओ, एयरटेल आणि Vi ने त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

June 28, 2024
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
Jio Bharat 4G Phone

जियोचा नवा Bharat 4G फोन अवघ्या ९९९ रुपयात!

July 3, 2023
Next Post
Sigma fp mirrorless camera

Sigma fp : जगातला सर्वात लहान फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech