फ्रेंड्सला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गूगलची गंमत!

Friends Google Easter Egg

फ्रेंड्स या लोकप्रिय अमेरिकन कॉमेडी टीव्ही शोला २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त गूगलने खास ईस्टर एग्सचा समावेश केला आहे! तरुणाईमध्ये हा शो अजूनही मोठ्या प्रमाणावर पाहिला जातो. २२ सप्टेंबर १९९४ ला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. यामधील सहा मित्र मैत्रिणी चँडलर, जोई, रॉस, मोनिका, फिबी, रेचल आणि त्यांचं दैनंदिन आयुष्याभोवती या मालिकेचं कथानक आहे.

जर तुम्ही फ्रेंड्स मालिका अजून पाहिली नसेल तर नेटफ्लिक्सवर पाहू शकाल : https://www.netflix.com/title/70153404

गूगलच्या या फ्रेंड्स ईस्टर एग पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तिरेखेचं नाव टाकून सर्च करायचं आहे. त्यानंतर येणाऱ्या कार्ड्समध्ये इमेजेस खाली त्या व्यक्तिरेखेचं मालिकेतलं वैशिष्ट्य दर्शवणारी गोष्ट दिसेल त्यावर क्लिक करा आणि गंमत पहा…! उदा. जर तुम्ही Ross Geller (किंवा रॉस गेलर असं मराठीतही) सर्च केलं तर काऊच दिसेल ज्यावर क्लिक केल्यास प्रसिद्ध सीन काऊच पिव्हटमधील गंमत पाहता येईल. Joey Tribbiani असं सर्च केल्यास चार पाच पदार्थ अवतरतील आणि जोईचा प्रसिद्ध डायलॉग ऐकायला येईल!
खालील यादीत आपण सहा जणांसाठी तयार करण्यात आलेले सहा ईस्टर एग पाहू शकाल.

Joey Tribbiani : “Joey doesn’t share food”
Chandler Bing : One with a Chick and a Duck.
Ross Geller : Screen starts pivoting (Click Three Times)
Phoebe Buffay : Smelly Cat Song
Rachel Green : Special haircut
Monica Geller : Cleans her name on screen

मध्यंतरी गूगलने अशाच प्रकारच ईस्टर एग अव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटामधील खलनायक थॅनोससाठीही आणलं होतं!

यानिमित्ताने फ्रेंड्समधल्या फिबी बुफेच्या गाजलेल्या स्मेली कॅट गाण्याची मराठी आवृत्ती भाडीपाने (भारतीय डिजिटल पार्टी) आणली आहे!

Exit mobile version