Google Pixel 4 व Pixel 4 XL सादर : सोबत Pixelbook Go, Buds, Nest Mini!

गूगलच्या प्रसिद्ध पिक्सल स्मार्टफोन मालिकेतले नवे फोन्स आज मेड बाय गूगल कार्यक्रमात सादर झाले असून यासोबत Google Pixel Buds, Pixelbook Go, Nest Mini, Nest WiFi ही उपकरणे सुद्धा सादर केली गेली आहेत. स्मार्टफोन्समध्ये कॅमेराबाबत सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या गूगल पिक्सलच्या नव्या मॉडेलमधील कॅमेराबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. Pixel 4 हा रडार सेन्सर असलेला जगातला सर्वात पहिला फोन आहे. मोशन सेन्सद्वारे तुम्ही जवळ असल्यावर फोन आपोआप Wake स्टेटमध्ये येईल. अनलॉक करण्यासाठी टॅप करण्याची गरज नाही. तुम्ही दूर जाताच आपोआप लॉक होईल! जेश्चर (हातवारे) करून हा फोन नियंत्रित करता येणार असून अलार्म वाजत असताना तुम्ही फोनजवळ हात नेल्यास अलार्मचा आवाज आपोआप कमी होईल!

Pixel 4 मधील OLED डिस्प्ले हा डिस्प्लेमेटच्या म्हणण्यानुसार सर्वोत्तम असणार आहे! यामधील कॅमेरा हा Computational Photography असलेला आहे. या फोनमधील कॅमेराद्वारे चक्क Astrophotography करता येईल! उदा मिल्की वे गॅलक्सीचा फोटो night sight द्वारे सहज काढता येईल.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गूगलचा हा फोन भारतात सादर होणार नाही!

Project Soli या रडार आधारित सुविधेमधील 60GHz mmWave frequency च्या गरजेमुळे गूगलला सरकारतर्फे परवानगी मिळालेली नाही त्यामुळे हा फोन भारतात उपलब्ध होणार नाहीये!

Google Pixel 4 XL

डिस्प्ले : 6.3″ QHD+ flexible OLED at 537 ppi 3200×1800 90Hz display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
GPU : Adreno 640
रॅम : 6GB
स्टोरेज : 64GB/128GB
कॅमेरा : 16MP ƒ/2.4 + 12.2MP ƒ/1.7
फ्रंट कॅमेरा : 8MP ƒ/2.0
बॅटरी : 2800mAh/3700mAh 18W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
इतर : Corning Gorilla Glass 5, Always-on display, IP68 dust and water protection
सेन्सर्स : Radar sensors for faster face unlock
रंग : Just Black, Clearly White, Oh So Orange
किंमत :
Pixel 4 $799
Pixel 4 XL $899

Google Pixel Buds : गूगल पिक्सल बड्स द्वारे गूगल आता स्वतःचे वायरलेस इयरबड्स आणत असून याची किंमत $179 असेल आणि हे २०२० मध्ये उपलब्ध होतील. हे एका चार्जवर ५ तास चालतील. Video : https://youtu.be/2MmAbDJK8YY

Google Pixelbook Go : ChromeOS आधारित लॅपटॉप असून याची किंमत $649 पासून सुरू होईल. यामध्ये नवं डिझाईन पाहायला मिळेल. नवा किबोर्ड सुद्धा जोडण्यात आला आहे. Intel Core m3/i5/i7 प्रोसेसर, 8GB/16GB रॅम, 64GB/128GB/256GB स्टोरेज

Nest Mini : हा एक स्मार्ट स्पीकर असून यामध्ये गूगल असिस्टंट जोडण्यात आला आहे. स्मार्ट होम अंतर्गत स्वस्त पर्याय यामार्फत उपलब्ध होत आहे. या उपकरणाची किंमती $49 असून हा २२ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल.

Nest WiFi : या वायफाय राऊटरमध्ये गूगल असिस्टंट आहे! वायफाय नेटवर्कसाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध. किंमत $269

Google Stadia गेमिंग प्लॅटफॉर्म १९ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. 10$ दरमहा दराने ही ऑनलाइन गेम स्ट्रीमिंग द्वारे गेम्स खेळण्याची सेवा उपलब्ध होणार आहे.

https://youtu.be/dmqWuUeA5Ug
Exit mobile version