Threads : इंस्टाग्रामचं खास जवळच्या मित्रांसाठी नवं अॅप

सध्या सोशल मीडिया माध्यमांमध्ये सर्वात लोकप्रिय ठरत असलेल्या इंस्टाग्रामने आता आणखी एक स्वतंत्र अॅप आणलं असून हे खास आपल्या जवळच्या मित्रांमध्ये संवाद साधण्यासाठी असेल. याचं नाव थ्रेड्स (Threads) असं असून हे अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध झालं आहे.

हे अॅप प्रामुख्याने कॅमेरा आणि जवळचे मित्र यांना समोर ठेऊन तयार करण्यात आलेलं असून या अॅपमधील डेटा म्हणजे फोटो व्हिडिओ केवळ आपल्या मित्रांनाच दिसू शकतील. अॅप उघडल्या उघडल्या कॅमेरा सुरू झालेला असेल जेणेकरून तुम्हाला फोटो/व्हिडिओ लगेच शेयर करता यावा! Close Friends साठी खास स्वतंत्र इनबॉक्स व नोटिफिकेशन्स असतील. जर तुम्ही इंस्टाग्रामवर Close Friends ची यादी बनवली नसेल तर नव्या अॅपमध्ये ते सुद्धा करू शकाल.

याद्वारे आपल्या मित्रांचे स्टेट्ससुद्धा स्वतंत्र पाहू शकाल. ऑटो स्टेट्स या सुविधेद्वारे आपल्याला काही स्टेट्स सुचवले जातील त्यामधून आपण निवडू शकता किंवा स्वतःच्या मर्जीनुसार तयार करूनही लावू शकाल. हे स्टेट्स कुणाला दिसणार व कोणाला नाही हे नियंत्रित करता येईल.

इंस्टाग्राम डायरेक्टचा वापर सुद्धा आपण नेहमीप्रमाणे चालू ठेऊ शकाल. थ्रेड्समधील मेसेज तिकडेसुद्धा त्या त्या मित्राच्या अकाऊंटमधील डायरेक्ट मेसेजेसमध्ये पाहता येतीलच.

Threads App Download Links : Threads on Google Play, Threads on iOS

Exit mobile version