गूगल प्लेवर २०१९ मधील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर!

दरवर्षीप्रमाणे गूगलतर्फे वर्षातील सर्वोत्तम अॅप्स गेम्स, बुक्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुगलकडून प्रथमच ‘फॅन फेव्हरेट’ विभागसुद्धा करण्यात आला असून यामध्ये यूजर्सच्या वोटिंगद्वारे विजेता ठरविण्यात आला आहे. चित्रपट, गाणी यांचीसुद्धा यादी अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता!

गूगल वरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स, चित्रपट, पुस्तके यांची अधिकृत यादी : Best of Google Play 2019

या विजेत्यांमध्ये ६ प्रकारे विभागणी करण्यात आली असून एकूण गुणवत्ता, डिझाईन, तांत्रिक कामगिरी व नावीन्य यांच्या आधारे ती विभागणी केलेली आहे. खाली ते प्रकार आणि त्यानंतर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अॅप असा उल्लेख आहे. नेहमीच फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राममध्ये अडकून राहणार्‍याना यामधील नावीन्य असलेले अॅप्स वापरुन पहायलाच हवेत…

अॅप्स

२०१९ चं सर्वोत्तम अॅप : Ablo: Talk to new people & explore the world : Best App of 2019 on Google Play
चॅट, व्हिडीओ कॉलद्वारे लाईव्ह ट्रान्सलेशन उपलब्ध करून देणारं हे अॅप २०१९ चं सर्वोत्तम अॅप ठरलं आहे! जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीसोबत आपण आपल्या भाषेत बोलनं सुरु करू शकतो जे भाषांतरित होऊन त्यांना त्यांच्या भाषेत दिसेल!

२०१९ चं यूजर्सना सर्वाधिक आवडलेलं अॅप : Spotify: Listen to your favourite music & podcasts : Users’ Choice App of 2019
स्पॉटिफाय हे गाणी, संगीत ऐकण्यासाठी लोकप्रिय अॅप असून जगभरातील कंटेंट या अॅपमध्ये उपलब्ध आहे.

दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम अॅप : Boosted – Productivity & Time Tracker : Best Everyday Essentials of 2019
तुम्ही रोज कोणत्या अॅपवर किती वेळ घालवता, आज दिवसभरात कोणती कामे केली, कोणती कामे करायची आहेत हे एका जागी सुंदर डिझाईन मध्ये पाहायला मिळतं!

वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्यासाठी अॅप : Work from Home, Earn Money, Resell with Meesho : Best Personal Growth Apps of 2019

२०१९ ची सर्वोत्तम छुपी रत्ने! : काही वैशिष्ट्यपूर्ण अॅप्स : Best Hidden Gems of 2019
Appy Weather: the most personal weather app
Fitvate – Gym Workout Trainer Fitness Coach Plans
MashApp – Video Punchlines
Morphin – CGI GIF Maker & Editor
Swoot – Podcasts with friends 🙂

२०१९ ची मजेशीर अॅप्स : Best for Fun Apps of 2019

Concepts – Sketch, Design, Illustrate
Enlight Pixaloop – Photo Animator & Photo Editor
Live Line & Cricket Scores – Cricket Exchange
Video Editor – Glitch Video Effects

गेम्स

२०१९ ची सर्वोत्तम गेम : Call of Duty : Mobile : Best Game of 2019 on Google Play
अपेक्षेप्रमाणे कॉल ऑफ ड्यूटी : मोबाइलची यावर्षीची सर्वोत्तम गेम म्हणून निवड झाली आहे. हीच गेम यूजर्सच्या आवडीमध्सुद्धा पहिल्या स्थानावर आहे!

Best Competitive : Brawl Stars, Dark Sword 2, SHADOWGUN LEGENDS, Stick Cricket Live

Best Indie : #DRIVE, Fly THIS!, Golf Peaks, Grayland Lite, ROOMS: The Toymaker’s Mansion

Best Casual Games of 2019 : 1945, Angry Birds Dream Blast, Ludo All Star, Masala Madness: Cooking Game, Overkill the Dead: Survival

Best Innovative : Alt-Frequencies, Assassin’s Creed Rebellion, Dungeon Faster, F1 Manager, Harry Potter: Wizards Unite

चित्रपट

चित्रपट प्रकारात गूगलने स्वतःची आवड जाहीर न करता केवळ यूजर्सच्या आवडीचा चित्रपट निवडला आहे. सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला अव्हेंजर्स एंडगेम इथेही स्थान टिकवून आहे!

Exit mobile version