एयरटेल देत आहे हजारो इ बुक्स मोफत! : Juggernaut Books अॅप

सध्या देशात करोना/कोरोना/COVID-19 मुळे लॉकडाऊन सुरू असताना घरबसल्या आपल्या यूजर्सना वेळ घालवता यावा किंवा त्या वेळेचा सदुपयोग करता यावा म्हणून अनेक कंपन्या त्यांच्या काही सेवा मोफत उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये आता एयरटेलसुद्धा सामील झालं आहे. त्यांची इ बुक म्हणजे ऑनलाइन पुस्तके वाचण्याची सेवा Juggernaut Books त्यांनी आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे! हा प्लॅटफॉर्म आधी Airtel Books या नावाने ओळखला जायचा

याविषयी माहिती देताना आदर्श नायर या एयरटेलच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की या अभूतपूर्व काळात एयरटेल आणि जगरनॉट यांनी लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं सोपं जावं आणि त्यासाठी असलेला उत्तम पर्याय म्हणजे वाचन. म्हणूनच आम्ही हे पाऊल उचललं आहे. एयरटेलतर्फे असा डिजिटल कंटेंट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू…

Juggernaut Books मध्ये आपल्याला विविध विषयांच्या इ बुक्स, कादंबऱ्या मोफत वाचता येतील. एयरटेलने २०१७ मध्ये जगरनॉट बुक्समध्ये हिस्सा खरेदी केला आहे. यांचं अॅप iOS व अँड्रॉइड दोन्ही ठिकाणी मोफत उपलब्ध आहे.

Download Juggernaut Books on Google Play play.google.com/store/apps/details?id=in.airtelbooks
Download Juggernaut Books on App Store : apps.apple.com/in/app/juggernaut-ebooks/id1358624599

यासोबत एयरटेलने करोनाबद्दल माहितीसाठी अपोलो हॉस्पिटल्ससोबत भागीदारी करून वेबसाइट सादर केली आहे.
https://airtel.apollo247.com

Exit mobile version